पंढरपूर लाईव्ह वृत्त:- खडतर परिश्रमातून मिळविलेले यश चिरंतन टिकते. पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर यांनी जे आपल्या आयुष्यात विविध खडतर प्रवासातुन हे यश मिळवले आहे ते खरे यश असून पंढरी वार्ताचे भवितव्य उज्वल आहे असे प्रतिपादन पंढरपूरचे माजी आमदार व पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी केले. सा.पंढरी वार्ता च्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
पत्रकार गृहनिर्माण साठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करु- सुधाकरपंत परिचारक
पंढरपूरमधुन प्रकाशित होणार्या साप्ताहिकांमधुन प्रसिध्द होणारे वृत्त परखड असते. यावेळी त्यांनी पंढरीतून जुन्या काळात प्रकाशित होणार्या कांही साप्ताहिकांच्या बाबतचे अनुभव तसेच त्याकाळात पत्रकार गृहनिर्माण साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत यासाठी जागा देणेपासून ते पत्रकारांना घरे बांधुन देण्यापर्यंतचा आपला अनुभव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कर्मयोगी सुधाकरपंतांनी कथन केला. हे सांगतानाच त्यांनी सांगितले की, या क्षेत्रात यश मिळते पण ते टिकवणे अवघड आहे. यासाठी आपल्या कार्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या पत्रकारांसाठी जसे पूर्वी आपण प्रयत्नपुर्वक गृहनिर्माण सोसायटी निर्माण केली. तशी सध्याच्या पत्रकारांनाही पत्रकार गृहनिर्माण सोसायटीची गरज असून यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी पत्रकारितेत येण्याची प्रेरणा दिली-राजकुमार शहापूरकर
आपल्या प्रास्ताविकात पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर यांनी सांगितले की, पंढरपूरच्या इतिहासात गवळी समाज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आलेला आहे. तसा राजकारणातही हा समाज अग्रणी भुमिका बजावत आहे. पंढरपूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी आदरणीय कर्मयोगी परिचारक यांनी समाजातील अनेकांना दिलेली आहे. पत्रकारितेमध्ये मात्र आमच्या समाजातून मी नशिब आजमावले. खुप खडतर प्रवास केला. मी धनाची श्रीमंती पाहिली आणि दरिद्री नारायणाचा राबताही आयुष्यात अनुभवला. आयुष्यात सुखामागे आलेले खुप मोठे दु:ख आनंदाने पचवले. मात्र आयुष्यात हार मानली नाही. पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी पत्रकारितेत काम करण्याची प्रेरणा दिली आणि या क्षेत्रात मी पदार्पण केले. स्वत:चे साप्ताहिक काढले. या कार्यात विठ्ठल टाईम्स् चे संपादक गौतम जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले. प्रारंभी मी साप्ताहिक चालु केले तेंव्हा अनेक अडचणी आल्या. एखाद्या आठवड्यात छपाईचे 300 रु. देणे सुध्दा जमत नसे तेंव्हा केलेली तारेवरची कसरत आठवली की आजही डोळे भरुन येतात. मात्र पत्रकारितेत कार्य करण्याची आपली निष्ठा मी कधीही ढळु दिली नाही. अविरतपणे हे साप्ताहिक प्रसिध्द करत राहिलो. आज पुरता यशस्वी नसलो तरी हे साप्ताहिक गेल्या पाच वर्षापासून नियमितपणे मोठ्या साईजमध्ये रंगीत प्रकाशित करु शकत आहे. तसेच वेगवेगळ्या विशेषांकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येत आहे. पंढरी वार्ताने आज आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. हे सर्व आमचे हितचिंतक, जाहिरातदार आणि वाचकांनी दिलेल्या प्रेमामुळे शक्य झाल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबुल केले.

वेळप्रसंगी आवश्यक ती मदत पंढरी वार्तास करु- द. बडवे
यावेळी सामाजिक कार्यकर्ते द. बडवे म्हणाले की, मी आजारी असतानाही राहाभाऊंचा फोब आल्याबरोबर या कार्यक्रमास हजर राहिलो. श्री. शहापूरकर हे आमच्या संस्थेच्या विविध बातम्या ठळकपणे प्रसिध्द करत असतात. त्यांच्या पंढरीॅ वार्तासाठी सर्वांनी जाहिरातीच्या स्वरुपात मदत करणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. मी रिटायर्ड माणुस आहे. तुटपुंजी पेन्शन मिळते. मात्र तरीही मी आज संकल्प करतो की आवश्यक तेंव्हा मी शक्य तेवढी जाहिरात रुपाने या साप्ताहिकास सहकार्य करीन. लवकरच पंढरी वार्ताचे दैनिक व्हावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
विविध दैनिकांमध्ये लाखोंच्या जाहिराती देणारे राजकारणी पंढरपूरमधील साप्ताहिकाच्या संपादकाला मात्र हजाराची जाहिरात पण देत नाहीत. ही मोठी शोकांतीका आहे -अभिराज उबाळे
यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अभिराज उबाळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पंढरपूरच्या पत्रकारितेत आत्ताची पिढी निश्चितच नेत्रदिपक कार्य करत आहे. अनेकजण आपापल्या पध्दतीने निर्भीडपणे लिखाण करुन पंढरपूरचे प्रश्न ऐरणीवर आणत आहे. साप्ताहिक छोटे असले तरी त्यातील लिखाण ‘ठिणगी सारखे असते. प्रत्येक संपादक पोटतिडकीने विविध प्रश्नांना वाचा फोडत असतो. आणि हे कार्य भल्या-भल्यांनाही जमत नाही. मात्र अशा पत्रकारांना सर्व स्तरातून दुर्लक्षीत केले जाते.
साप्ताहिक चालविताना त्यासाठी आर्थिक पाठबळ राजकीय आणि व्यावसायीक क्षेत्रातील लोकांनी देणे आवश्यकक आहे. मात्र प्रस्थापितांची मक्तेदारी येथे आडवी येते. विविध दैनिकांमध्ये लाखोंच्या जाहिराती देणारे राजकारणी पंढरपूरमधील आपला संपुर्ण वेळ पत्रकारितेसाठी देणार्या साप्ताहिकाच्या संपादकाला मात्र हजाराची जाहिरात पण देत नाहीत. ही मोठी शोकांतीका आहे. आज पंढरपूरचे पत्रकार भगवान वानखेडे यांनी सुरु केलेल्या ई-न्युज वेब पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यमातून अमेरीकेतील मराठी माणुस इथल्या घडामोडी पाहु शकतो. ही गुणवत्ता आहे आम्हा सर्वसामान्य पत्रकारांची. मात्र तरीही आम्ही उपेक्षीत का?
असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करुन पुढे त्यांनी परखडपणे सांगितले की, ‘‘इथे प्रस्थापितांना दुसर्या कुणी पत्रकारितेत आलेले चालत नाही असे चित्र अनुभवयला मिळाले आहे. इथे पत्रकारितेत कुणा एखाद्याचा कोंब फुटतो ना फुटतो तोच तो खुडण्यासाठीचे प्रयत्न चालु होतात.’’ मात्र तरीही आमच्यातील कांही गुणी पत्रकार वेगवेगळ्या प्रयत्नातून आपले अस्तित्व आणि वेगलेपण टिकविण्यात यशस्वी झालेले आहेत. सा.पंढरी वार्ता चालविताना राजकुमार शहापूरकर यांनी आपली झालेली दमछाक सांगितली त्यातच सगळे आले. आज शहापूरकरांनी जे करुन दाखविले त्याला तोड नाही. यावेळी उपस्थित श्री.परिचारक यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की, ‘‘आपल्या काळात तुम्ही पंढरपूरच्या पत्रकारांसाठी जसे पत्रकार नगर निर्माण करुन दिलेत तसे आमच्या सध्याच्या पत्रकारांना एक पत्रकार गृहनिर्माण सोसायटी निर्माण करुन द्यावी. आमच्यातील अनेक पत्रकार भाड्याच्या घरात जीवन कंठत आहेत. त्यांना डोक्यावर हक्काचे छप्पर आपणच देवु शकता. सांगोला रोडवर माढाची जागा आहे. राजकारणात आपले आजही वजन आहे. आपला शब्द प्रमाण आहे. तेंव्हा ही जागा पत्रकारांना मिळवुन देण्यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती केली.
राजाभाऊंनी पत्रकार संघासाठी आपल्या कार्यालयातील एक खोली वापरावयास विनामुल्य दिली- हरिभाऊ प्रक्षाळे
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनीॅ आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, आम्हा पत्रकारांना पंढरपूरमध्ये बसायलाही जागा नाही. आमच्या मिटींग वगैरेसाठी पत्रकार भवन हवे आहे. मात्र बर्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर यांनी आपल्या कार्यालयातील एक खोली पत्रकार संघासाठी देवुन मोठे कार्य केले आहे. श्री.परिचारक यांनी आमचा गृहनिर्माणचा आणि पत्रकार व भवनचा प्रश्न मार्गी लावावा. आमचे प्रयत्न तर चालुच आहेत.
यावेळी पंढरी वार्ताच्या पुढील कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संपादक राजकुमार शहापूरकर यांचा सत्कार सुधाकरपंत परिचारक यांचे हस्ते झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.राज सर्वगोड, श्री.ननवरे सर व सतीश अप्पा शिंदे, बाबा ग्रुपचे उत्तम चव्हाण, द. बडवे, डोळ सर, इंगोले सर, अरुण जाधव आदी अनेक मान्यवरांनी श्री.शहापूरकर यांचा सत्कार केला. यावेळी गवळी समाजाचे माजी नगरसेवक यमाजी शहापूरकर प्रमुख उपस्थित होते. तसेच यावेळी माजी नगरसेवक धनंजय मिसाळ, तानाजी जाधव, अरुण जाधव, व्यंकटेश बडवे, डॉ.भोसले (काका), पत्रकार महालिंग दुधाळे, श्रीकांत कसबे, दिनेश खंडेलवाल, नंदकुमार देशपांडे, भगवान वानखेडे, सुधाकर जाधव, गौतम जाधव, दत्ता पाटील, महेश कदम, सचिन शिंदे, विकास पवार, श्री.डोळ सर, श्री.ननवरे सर, ज्ञानेश्वर चांडोले, शंकर कदम, श्री.यादव, इंगोले सर व सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक पत्रकार प्रविण नागणे सर यांनी केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर आतकरे, श्री. कुलकर्णी, श्री.मंगसुळकर आदींनी परिश्रम घेतले..

0 Comments