आषाढी वारीसाठी आपत्ती प्रतिसाद प्रणाली राबविणार- जिल्हाधिकारी-तुकाराम मुंढे

आषाढी वारीसाठी आपत्ती प्रतिसाद  प्रणाली राबविणार- जिल्हाधिकारी-तुकाराम मुंढे              
पंढरपूर दि.30-   आषाढी यात्रा सोहळ्याच्या  नियोजन व व्यवस्थापनासाठी यंदा प्रथमच  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्ती प्रतिसाद यंत्रणेचा (आय.आर.एस) वापर करण्यात येणार असल्याची माहिती ‍जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.

स्थायी पदाधिकार्‍यांमध्ये अध्यक्ष हे पंढरपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश असावेत, कार्याध्यक्षपदी स्वतंत्र आय.ए.एस. अधिखारी असावेत, सचिव पदी पंढरपूर चे
पंढरपूर येथील  श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीरातील व्यवस्थेची पाहणी  केल्यानंतर जिल्हाधिकारी श्री.मुंढे यांनी मंदीर समितीच्या कार्यालयात  ही माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे, प्रांतधिकारी संजय तेली, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी  शिवाजी कादबाने, तहसिलदार गजानन गुरव, न.पाचे मुख्यधिकारी शंकर गोरे, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन आदी उपस्थित होते.  यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मुंढे म्हणाले की, जिल्ह्यात पालख्यांनी प्रवेश केल्यापासून ते  परतीच्या प्रवासापर्यंत या आय.आर.एस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. वारी मध्ये उदभवणा-या कुठल्याही  आपत्तीचे व्यवस्थापन व त्या आपत्तीला प्रतिसाद देण्याचे काम या प्रणालीव्दारे करण्यात येणार आहे.  या प्रणालीमध्ये  अत्याधुनिक यंत्रणेच्या वापर केल्याने पालखी तळापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यत   संपर्क राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वारीसाठी येणा-या वारक-यांना आवश्यक सुविधा योग्य दर्जाच्या व वेळेत मिळाव्यात त्याचबरोबर  त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल त्यासाठी टोल फ्री नंबर कार्यान्वित करण्यात येणार  आहे तसेच मंदीर समितीकडून दर्शनमंडपामध्ये मोफत चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी न.पा ची मालकी असलेल्या 65 एकर जागेमध्ये पाहणी करुन भाविकांसाठी आवश्यक  असणा-या सोयी-सुविधा तसेच वाहतुकी बाबत संबधीत अधिका-यांना सुचना केल्या. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.    
                                          00000

Post a Comment

0 Comments