पंढरपूर 01 :- जैनवाडी वि.का.सहकारी सेवा सोसायटीची सन 2014-15 ते 2019-20 सालासाठी
झालेल्या निवडणुक ही बिनविरोध होवुन सर्वच्या सर्व 13 उमेदवार हे परिचारक गटाचे निवडुन आले आहेत. सदर निवडणुक बिनविरोध करण्यासाठी अॅड.शांतीनाथ मेंढगिरी, अशोक मिरजे, किरण दानोळे, श्रेणिक मिरजे यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडणुक अधिकारी म्हणून श्री.जी.के.कळसकर यांनी काम पाहिले. यावेळी सोसायटीचे सेेक्रेटरी म्हणून संजय भोसेकर, सुरेश उमडाळे, राजेंद्र शिंगटे, विजयकुमार शेडबाळे यांची
निवड करणेत आली.
जैनवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर बिनविरोध निवडुन आलेले सर्वसाधारण गटातील उमेदवार स्वप्निल किरण दानोळे, दिनेश अशोक मिरजे, रावसाहेब शामराव दानोळे, आण्णा रामू सदलगे, कलगोंडा रामू दानोळे, राहूल कांतीलाल हातगिने, विजय देवाप्पा मेंढगिरी, बाबासो नारायण शिंगटे तसेच महिला राखीव गटातून निवडुन आलेले उमेदवार जिजाबाई ज्ञानदेव जाधव व राजाबाई गोरख गोफणे, इतर मागासवर्गातून निवडुन आलेले उमेदवार दत्तात्रय दामू सुतार भटक्या जाती/भटक्या विमुक्त जमातीमधुन निवडुन आलेले भारत ज्ञानोबा गोफणे अनु-जाती/जमाती मधुन भगवान रामचंद्र कांबळे हे बिनविरोध निवडुन आले.
सदर विजयी उमेदवारांचे पांडुरंग परिवाराचे संस्थापक मा.सुधाकरपंत परिचारक व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मा.प्रशांत परिचारक यांनी अभिनंदन केले.
*********







0 Comments