विस्तारित समाधान योजनेंतर्गत आयोजित मेळाव्यात 13 हजार 984 लाभार्थीनी घेतला लाभ -तहसिलदार गजानन गुरव

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-  21ऑक्टोबर 2015

पंढरपूर दिनांक 21:- महाराजस्व अभियान विस्तारित समाधान योजनेंतर्गत उजनी वसाहत सांस्कृतिक हॉल परिसरात आयोजित मेळाव्यात 13 हजार 984 लाभार्थीना विविध प्रकाराचे दाखले, प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती तहसिलदार गजानन गुरव यांनी दिली.

            शासनाच्या उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी यासाठी महाराजस्व अभियान विस्तारित समाधान योजजनेंतर्गत हा मेळावा आयोजित आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महसूल विभागाकडून सर्वाधिक 6 हजार 228 दाखल्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये जातीचे दाखले 320, नॉन क्रिमिलेयर दाखले 215, वय व अधिवास प्रमाणपत्रे 530, उत्पन्न दाखला 1498, शिधापत्रिका 1223, 7/12 उतारे 2332 तर 110 आधार कार्डची नोंदणी करण्यात आली. पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत 35 लाभार्थीना लाभ देण्यात तर माहिती विभागाच्या लोकराज्य स्टॉलवर 500 लोकराज्य अंकाचे वितरण करण्यात आले.
            पंचायत समिती पंढरपूर यांच्यावतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर 4 हजार 57  लाभार्थीना लाभ देण्यात  आला. यामध्ये शौचालय दाखले 1167, 8-अ उतारे 1333, जन्म मृत्यू दाखले 485 आणि 1072 कर मागणी येणे- देणे  दाखल्यांचा समावेश आहे.  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर मार्फत 418, नगरपरिषद पंढरपूर 500, तालुका कृषि अधिकारी कार्यालय 232, सामाजिक वनिकरण विभाग 983, एस. टी. महामंडळ पंढरपूर आगार 27, उप अधीक्षक भूमि अभिलेख 13, अन्न व औषध प्रशासन विभाग 4, महावितरण कंपनी 4, उप जिल्हा रुग्णालय पंढरपूरमार्फत 249, बी.एस.एन.एल. 25 आणि पशुसंवर्धन विभाग पंढरपूर यांच्या स्टॉलवर 709 लाभार्थीनी लाभ घेतला. 

 



        

 


Post a Comment

0 Comments