विस्तारित समाधान योजनेंतर्गत घेतलेला मेळावा स्तुत्य उपक्रम - जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे............शासन योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-  20 ऑक्टोबर 2015

पंढरपूर दि. 20 :-  शासन योजना प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी, शासनाच्या उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी यासाठी महाराजस्व अभियान विस्तारित समाधान योजजनेंतर्गत घेतलेला मेळावा   हा स्तुत्य उपक्रम असून अशा मेळाव्यांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे महाराजस्व अभियान विस्तारित समाधान योजनेंतर्गत येथील उजनी वसाहत सांस्कृतिक हॉल परिसरात आयोजित केलेल्या मेळाव्यात जिल्हाधिकारी मुंढे बोलत होते. 

                     कार्यक्रमास पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, तहसिलदार गजानन गुरव, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्याधिकारी शंकर गोरे,गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे उपस्थित जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले, शासन राबवित असलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थीला मिळावा, योजनेच्या लाभापासून लाभार्थीची आर्थिक उन्नती व्हावी हा विस्तारित समाधान योजनेचा मुख्य उद्देश आहे. विस्तारित समाधान योजना महसूल विभागापुरती मर्यादित न राहता या योजनेत शासनाचे सर्व विभागांचा समावेश होऊन त्यांच्या मार्फत राबिवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती लाभार्थी, जनतेला देण्याच्या उद्देशानाच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
         या पुढील काळात ही असेच मेळावे आयोजित करुन शासनाच्या 52 विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात येईल. तसेच या पुढील काळात सर्कल पातळीवर अशा मेळाव्यांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात येईल. प्रत्यक्ष लाभार्थीला त्याच्यासाठी असणारी योजना अशा मेळाव्यातून त्याच्यापर्यंत तर पोहचते आणि त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभही त्याला घेता येतो. प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमाचा लाभ जनतेने घ्यावा, यामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपली उन्नती साधावी असे आवाहनही जिल्हाधिकारी मुंढे यांनी या प्रसंगी केले.
            शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन इंटरनेटच्या युगात शासनाच्या सर्व योजनांची माहिती आपल्याला मिळू शकते पण ग्रामीण आधुनिक शेतीकडे वळावे.  यामुळे उत्पादन वाढल्याने त्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. बेरोजगार युवक व बचत गटासाठी शासनाच्या विविध योजना असून त्यांनी याचा लाभ घ्यावा.उद्योगासाठी आर्थिक मदतीच्या असणाऱ्या योजना व प्रशिक्षणाचा लाभ  घ्यावा. 

                     जिल्हाधिकारी म्हणाले, जनतेने स्वच्छतेला प्राधान्य देणे अत्यावश्यक असून शासन स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी अनुदान देण्यात येत असून ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शौचालय बांधून शहर/ गाव हागणदारी मुक्त ठेवावे. शहर, गाव स्वच्छ ठेवण्याठी आपणच धनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे म्हणाले, महसूल विभागामार्फत घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमामुळे लोकांच्यात जनजागृती होण्यासाठी मदत होणार आहे. शासनाच्या योजना सामान्य

जनतेपर्यंत पोहचण्याबरोबच त्याची अंमलबजावणीही चांगल्या पध्दतीने होणार आहे.  महसूल विभागाने या उक्रमामध्ये सर्व विभागाना प्रधान्य दिलेल्यामुळे लोकांना शासनाच्या विविध विभागाची माहिती व योजनांची माहिती  मिळणार असल्याचेही ते म्हणाले. महाराजस्व अभियान विस्तारित समाधान योजनेंतर्गत आयोजित मेळाव्यात 22 स्टॉल उभारण्यात आले असून यामध्ये  महसूल, नगरपरिषद, कृषि, सामाजिक वनीकरण, एस.टी. महामंडळ, भूमि अभिलेख, बी.एस.एन.एल.,अन्न व औषध प्रशासन, महावितरण, आरोग्य विभाग,जलसंपदा, पशुसंवर्धन, पोलीस, सहकार, उप प्रादेशिक परिवहन, माहिती विभाग, पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास योजना, महिला व बाल कल्याण, सेतू, महा ई सेवा केंद्र/आधार केंद्राच्या स्टॉलचा समावेश आहे.
                      पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधान भोसले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तहसिलदार गजानन गुरव यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात मेळाव्याबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्याधिकारी याप्रसंगी पात्र लाभार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्रे, अनुदानाचे धनादेश, एस.टी. सवलत पास, रेशन कार्ड, घरगुती वीज कनेक्शन मीटर, शौचालय बांधकाम मंजुरी आदेश, अपंगासाठी श्रवण यंत्रे, तीन चाकी  सायकल, ब्रेल बुक, बियाणे, समाज कल्याण विभागाकडील योजना लाभ, पर्यावरण संवर्धनासाठी रोप वाटप करण्यात आले.  मेळाव्यात आधार कार्ड नोंदणी, आर.टी.ओ. विभागाकडून लायन्स नोंदणी, आरोग्य विभामार्फत रुग्णांची तपासणी आदि कामे मेळाव्यात करण्यता आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी मेळाव्यातील सर्व स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. कार्यक्रमास मान्यवर नगरसेवक, पदाधिकारी, विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, लाभार्थी, पंढरपूर शहरातील नगरिकांसह तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.0000000





         


Post a Comment

0 Comments