आमदार भारत भालके यांचे हस्ते गोपाळपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

पंढरपूर ः दि.10 - पंढरपूर तालुक्यातील मौजे गोपाळपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर

कारखान्याचे संचालक श्री शिवाजी आसबे यांच्या पत्नी तसेच तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ.विमल शिवाजी आसबे यांची सरपंचपदी व उपसरपंचपदी श्री संतराम विश्‍वास गुरव यांची निवड गोपाळपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.10.10.2015 रोजी दु.02.00 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी श्री भडंगे साहेब, ग्रामसेवक श्री भुसे, तलाठी बरबडे मॅडम तसेच तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री गावडे साहेब यांचे उपस्थितीत पार पडली.

              सदर सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री भारत भालके यांनी महावीर नगर पंढरपूर येथील त्यांचे संपर्क कार्यालयामध्ये केला.
               सदरवेळी सर्वश्री अंकूश सावंत, महादेव मस्के, श्रीकांत लामतुरे, दत्तात्रय पिसे, अरूण बनसोडे, भिमा देवमारे, अमोल सलगर, रघुनाथ पवार, सलीम काझी, सोमनाथ आसबे, कैलास आसबे, विजय पाटील, विकास पाटील, दिपक सुरवसे, संदिप बनसोडे, संतोष बनसोडे, मारूती मस्के, बापू सावंत गोपाळपूर येथील आदीसंह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

___

Post a Comment

0 Comments