बालनाट्यामुळे मुले संस्कारक्षम बनतात-गट शिक्षणाधिकारी सुलभा वठारे (पंचायत समिती पंढरपूर)

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 

पंढरपूर ... सोलापूर येथे संपन्न होणारे पहिले बालनाट्य संमेलन विद्याथ्यारसाठी एक पर्वणी

घोषणा करण्यात

आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्याथ्यारनी सहभागी होवून आपल्या सुप्त कलागुणांना वाव दयावा आणि संमेलनाचा आनंद घ्यावा.नाट्यकलेमुळे मुले संस्कारमय बनतात असे प्रतिपादन पंचायत समिती पंढरपूरच्या गट शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी संमेलनाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीने इंग्लिश मेडियम स्कूल, पंढरपूर येथे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व संमेलनाचे पदाधिकारी यांची सहविचार सभा आयोजित केली होती.

             सदर सभेस बालनाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष दादा साळुंखे, प्रांतिक सदस्य दिलीप कोरके, समन्वयक प्रा.इसाक शेख, प्रवक्ते अमोल धाबळे तसेच पुणे विभाग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आर.डी.पवार, पंढरपूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शेंडगे सर, आश्रमशाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जगताप सर तसेच शिक्षण विस्तार अधिकारी बिभिषण रणदिवे, काळुंगे, नकाते साहेब आदी उपस्थित होते.
               सभेचे प्रास्ताविक व संमेलनाची रूपरेषा सहकार्यवाह विक्रम बिस्कीटे सर यांनी स्पष्ट केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्यवाह सर्वश्री राजेंद्र उराड, सदस्य रवि शेवडे, रफिक शेख, छायाचित्रकार सोमा भादुले, सुजित मोरे, सुधीर घोडके, रामा निळे, गिरिष इंदापूरकर, शरद राजगुरू यांनी परिश्रम घेतले.
___




Post a Comment

0 Comments