पंढरीतील संत मुक्ताबाई मठात रंगला ‘‘महाभोंडला’’ जुन्या परंपरेचे नवीन पिढीने अनुकरण करावे - सौ.सिमाताई परिचारक

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 10 ऑक्टोबर 2015

           हस्त नक्षत्रात साजरा केला जाणारा भोंडला (हादगा) हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा भाग असून जुन्या प्रथा, परंपरा, सण वार जोपासणारा हा स्तुत्य उपक्रम असून  

नवीन पिढीने त्याचे अनुकरण करावे असे आवाहन सौ.सिमाताई परिचारक यांनी केले.संत मुक्ताबाई मठामध्ये नगरसेविका सौ.सविता सत्यविजय मोहोळकर व श्री समर्थ रामदास तालीम तरूण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाभोंडला’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.शैलाताई होरणे, सौ.रेखाताई आचलारे, सौ.वासंतीताई बडवे, सौ.अरूणाताई येवनकर, सौ.अलकाताई डोंगरे, सौ.आरती परिचारक, सौ.उज्वलाताई आचलारे , अर्बन बँकेच्या संचालिका सौ.रेखा अभंगराव इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

            मुक्ताबाईच्या मठामधील भव्य सभामंडपात हत्तीच्या मोठ्या प्रतिमेचे पूजन सौ.सिमाताई परिचारक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी हत्तीच्या प्रतिमेच्या भोवती सुरेख रांगोळी काढणार्‍या सौ.गंभीर वहिनींचा तसेच हस्त नक्षत्रातील हादग्याच्या जुन्या पारंपारिक गाणी तोंडपाठ असलेल्या अर्बन बँक महिला शाखेच्या शाखाधिकारी सौ.माळगी वहिनी व प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सौ.सविता मोहोळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
            
         कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका सौ.सविता मोहोळकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, हस्त नक्षत्रामध्ये महिला घराच्या दारामध्ये पाटावर रांगोळीने हत्तीचे चित्र रेखाटून जुन्या पारंपारिक गाण्यांवर ङ्गेर धरून वरूणराजाची आळवणी करीत असत व शेवटी खिरापत ओळखण्यात पूर्वी आम्हाला खूप आनंद मिळत असे. परंतू अलिकडच्या काळात हा सण लोप पावत चालला आहे. हस्त नक्षत्रामध्ये वरूण राजा चांगला बरसू दे, धन धान्य चांगले पिकू दे, धनी सुखी राहू दे अशी भावना हा सण साजरा करण्यामागे आहे. नवीन पिढीला आधुनिक युगात या जुन्या मराठमोळ्या संस्कृतीची माहिती व्हावी केवळ या उद्देशाने मी गेले 5 वर्षापासून हा कार्यक्रम घेत असते, असे सांगितले.कवठेकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.माया कुलकर्णी-सांगोलकर यांनी सुरेख सुत्रसंचालन केले.
               या कार्यक्रमाला सुमारे 400 हून अधिक महिला, तरूणींचा उत्साही सहभाग दिसून आला. शेवटी खिरापत ओळखून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
_______




Post a Comment

0 Comments