पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि.9 ऑक्टोबर 2015
पंढरपूर तहसिल कार्यालयातील जेलच्या जेलरला आज सायंकाळी 400 रु. ची लाच घेताना अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर च्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले असून याबाबत अधिक तपास चालु आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार व त्यांच्या भावाविरुध्द पंढरपूर तालुका पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी सीआरपी 151 प्रमाणे एका चॅप्टर केसमध्ये बाँड लिहून घेणेकरिता व वॉरंट न काढणेकरिता पंढरपूर तहसिल कार्यालयातील जेलचे
जेलर (जबाबी संकलन विभागातील लिपीक) यांनी 400.- रुपये च्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार दि. 9/10/2015 रोजी नोंदविली होती. त्यानुसार आज तहसिल कार्यालय पंढरपूर येथील जबाबी संकलन विभाग येथील वरील लिपीक शिंदे यांचेविरुध्द लाचेचा सापळा लावण्यात आला होता. या सापळ्यादरम्यान पंढरपूर तहसिल कार्यालयातील जेलचे जेलर (जबाबी संकलन विभाग-पंढरपूर जि. सोलापूर वर्ग-3 लिपीक) सोमनाथ नंदकुमार शिंदे (31) यांनी तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना वरील नमुद केलेल्या कारणासाठी 400/- रु. लाच खाजगी इसम प्रमोद चिमन वाघेल यांचेमार्फत 400/- रु. लाच जबाबी संकलन विभाग, तहसिल कार्यालय पंढरपूर येथे स्विकारली. असता खाजगी इसम प्रमोद चिमन वाघेल (वय-29) यांना अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी रंगेहाथ पकडले आहे.
यावेळी अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर युनीट ने पंढरपूर लाईव्ह साठी दिलेल्या प्रेस नोट मध्ये जनतेला आवाहन केले आहे की, जर कोणी शासकीय/ोनमशासकीय लोकसेवक त्याचे पदावरील काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी प्रत्यक्ष किंवा टोल फ्री क्रमांक 1064, फोन नं. 0217/2312668 वर संपर्क साधावा. सोलापूर अॅन्टी करप्शन ब्युरो चे पोलिस निरीक्षक यांचा मोबाईल क्र. 8888813154 असा आहे.
___________





0 Comments