पंढरपूर, दि. 07 :- पंढरपूर तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव

सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 11.00 तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केला असून तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 65 ब्रास वाळू करकंब पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार गजानन गुरव यांनी दिली.

या वाळू साठ्याची किंमत सुमारे 78 हजार रुपये इतकी असून या जप्त वाळू साठ्यासाठी ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळूसाठयाची पाहणी करावी तसेच लिलावात भाग घेवून सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या लिलावधारकाने संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वता:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणांवरुन वाळू घेवून जावी तसेच लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिदार गजानन गुरव यांनी केले आहे.
______________
________________
0 Comments