पंढरपूर लाईव्ह वृत्त:-गुरुवार दि. 29 ऑक्टोबर 2015
पंढरपूर, दि. 28 :- उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे जिल्हा स्तरावरील पोषण पुनर्वसन केंद्र मंजूर झाले असून या केंद्राच्या उभारणीबाबत रुग्णालयात बैठक संपन्न झाली. ही बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल भटकुंबे, गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, उप जिल्हा रुग्णालय पंढरपूरचे अधीक्षक डॉ. श्रीनीवास कुरुलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोषण पुनर्वसन केंद्राच्या जागेची पाहणी करुन रुग्णालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या व रुग्णालयामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांबाबत समाधान व्यक्त केले.
शासनाच्या आरोग्य विभागाने नवीन पोषण पुनर्वसन केंद्र पंढरपूर येथे मंजूर केले आहे. वैद्यकीय गुंतागुंत असणाऱ्या सॅम व अतिजोखमीच्या बालकांचे वैद्यकीय व्यवस्थापन करणे तसेच त्यांच्यामधील मृत्युचे प्रमाण कमी करणेबाबत केंद्र कार्यरत राहणार आहे. या केंद्रासाठी आवश्यक असणारा निधी, कर्मचारी शासनाने मंजूर केला असून सोलापूर जिल्ह्यातील 138 बालकांवर या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत.
बैठकीस रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
______________







0 Comments