पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबीर संपन्न

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-गुरुवार  दि. 29 ऑक्टोबर 2015

           पंढरपूर, दि. 29 :-  हृदयरोग दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे आयोजित शिबीराचा 76 रुग्णांनी लाभ घेतला. उपजिल्हा रुग्णालय व अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज व रिसर्च सेंटर, कुंभारी  यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
            या शिबीराचे उद्धाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप जिल्हा रुग्णालय पंढरपूरचे डॉ. श्रीनीवास कुरुलकर, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोनवणे आणि अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. रिजवान, श्रीमती डॉ.  रायते, डॉ. करजखेडे, डॉ. शेख उपस्थित होते. शिबीरात नोंदणी केलेल्या रुग्णांची मोफत तपासणी, मोफत इसीजी काढण्यात आले.

       ______________

 



Post a Comment

0 Comments