पंढरपूर (प्रतिनिधी) :- दि. 26 ऑक्टोबर 2015
पंढरपूर, दि. 26 :- मंगळवेढा तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 11.00 तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 81 ब्रास वाळू जप्त केली असून हा वाळू साठा मौजे अरळी येथे ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 1 लाख 13 हजार 400 रुपये इतकी आहे.
जप्त वाळू साठ्यासाठी ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी तसेच लिलावात भाग घेवून सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या लिलावधारकाने संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वता:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिदार विनोद रणवरे यांनी केले आहे.
______________






0 Comments