राष्ट्रपिता महात्मा गांधीमुळे भारताची जगात ओळख! म.गांधीच्या सप्तसुत्रीनुसार जीवन जगावे! - जेष्ठ पत्रकार अरुण खोरे

श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी !

 

पंढरपूर:- ‘राष्ट्रपिता म. गांधीच्या स्वावलंबी व अहिंसा वृत्तीचे संपूर्ण जगाने स्वागत केले असून स्वच्छतेची शिकवण देताना गांधींनी परिसर, ग्राम व व्यक्ति यांची त्रिसुत्री कायम बिंबवली आणि त्यांची हिच सुत्रे परदेशात देखील अवलंबली गेली. त्यांचे विचार परिवर्तन करणारे होते. त्याग, शांती हे गुण असल्यामुळे त्यांचे कार्य जगात उठावदार ठरले. गांधीच्या नौखारी यात्रेपासुन ते दांडीयात्रेपर्यंतचा प्रवास सार्‍या विश्‍वाने केला असून याच ‘गांधी’िविचारांमुळे भारताची जगात ओळख निर्माण झाली.’ असे प्रतिपादन गांधी फोरमचे प्रमुख, गांधीवादी विचारवंत व जेष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केले.

          येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या ओपन अ‍ॅम्पी थिएटरमध्ये महात्मा गांधी यांची 146 वी जयंती व लालबहाद्दुरशास्त्री यांची 111वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहूणे जेष्ठ पत्रकार अरुण खोरे गंाधीवादी विचार मांडत होते. महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. खोरे यांनी संदेश फलकावर ‘गांधी सेड, ‘बी चेंज, यु सी इंन दी वर्ल्ड, वुई

फालो हीज मेसेज!’ हे विद्यार्थ्यांंंना स्फूर्ती देणारे वाक्य लिहले. प्रा. यशपाल खेडकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तर प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘महात्मा गांधीजी कोणतेही काम अथवा सल्ला प्रथम स्वत: आचरणात आणायचे त्यानंतर दुसर्‍यांना सांगायचे त्यामुळे त्यांचे जीवन तर यशस्वी झाले त्याचबरोबर त्यांच्या विचार सरणीतून आपल्या मर्यादाही स्पष्ट केल्या .महात्मा गांधीचा विचार ही स्वातंत्र्यपूर्व काळात एक नवी चळवळ म्हणून उभी राहीली असली तरी त्यांचे विचार आजही प्रेरणा देणारे आहे.’ असे सांगून म. गांधींच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला. प्रियंका जाधव व ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे यांनी समाजसुधारण्यासाठी स्वांतत्र्यापूर्वीचा साम्राज्यवाद सांगून दांडीयात्रेचे महत्व पटवून दिले. पुढे बोलताना पत्रकार खोरे म्हणाले, ‘कामाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय समाधान, चरित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय पूजा व तत्वाशिवाय राजकारण या सप्तसुत्रींची सविस्तर माहिती सांगून याद्वारे जीवन अप्रतिम जगता येते.’ असे सांगून त्यांनी चंपारण्यातील शेतकर्‍यांनी सर्वप्रथम गंाधींना महात्मा संबोधल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी गांधींच्या आयुष्यातील अनेक पैलू उलघडून दाखविले. म. गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम स्वप्नाली चव्हाण , द्वितीय अक्षता अब्दागिरे व तृतीय पुजा गवळी यांचे तसेच प्रा.श्रद्धा मिरजकर, डॉ. मानसी पाटील, प्रा.महुवा विश्‍वास, प्रा.पपीया विश्‍वास, प्रा.महेश मठपती आदिंचे शोध प्रंबध प्रकाशित झाल्यामुळे त्याचाही सत्कार करण्यात आला.याचवेळी मुलांचे व मुलींचे वसतिगृह स्वच्छतेची स्पर्धा आयोजित करण्यात आली हेाती. त्यातील विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छ भारत अभियान आणि महात्मा गांधींच्या विचारसरणीला अनुसरुन विविध प्रकारच्या पोस्टरचे प्रदर्शनदेखील अप्रतिम झाल्याचे सांगून खोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्याची पाठ थोपटली पुढे पाहुण्यांच्या हस्ते स्वेरीयनच्या बाराव्या त्रैमासिकाचे प्रकाशनही करण्यात आले.
        यावेळी भोसले गुरुजी, पत्रकार सिध्दार्थ ढवळे, पत्रकार दिपक होमकर, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, विश्‍वस्त एच.एम.बागल, विश्‍वस्त बी. डी.रोंगे, इतर तिनही महाविद्यालयाचे प्राचायर्, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ए.जी कोरके, प्रा.यशपाल खेडकर यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी प्रतिनिधी प्रविण चव्हाण, मनोज पानगावडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओंकार क्षीरसागर व वृषाली कुंभार यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी निलेश पवार यांनी आभार मानले.
________________


Post a Comment

0 Comments