तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळूचा लिलाव
पंढरपूर, दि. 05 :- पंढरपूर तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 11.00 तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती तहसिलदार गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 290 ब्रास वाळू जप्त केली आहे. सदरची 50 ब्रास वाळू तालुका पोलिस स्टेशन पंढरपूर येथे तर 240 ब्रास वाळू साठा शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे ठेवण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणाच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 3 लाख 48 हजार रुपये इतकी आहे.
जप्त वाळू साठ्यासाठी ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळूसाठयाची पाहणी करावी तसेच लिलावात भाग घेवून सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या लिलावधारकाने संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वता:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणांवरुन वाळू घेवून जावी तसेच लिवात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिदार गजानन गुरव यांनी केले आहे.
पंढरपूर
मुलाने केली स्वतःच्या वडिलांची हत्या..... दगडाने ठेचून केली हत्या..वडील विलास गाढवे जागीच ठार.... जमीनीच्या वादातून हत्या केल्याचा संशय...जगदंबा नगर मधील घटना
पंढरपूर उजनी अपडेट
दौंडच्या विसर्गात वाढ . उजनी धरण पाणीसाठा
दि.५आँक्टो २0१५ सायं:६ वाजता
एकूण पाणीपातळी: ४९१.५१३मी.
एकूण पाणीसाठा :१९००.२४ द.ल.घ.मी.
उपयुक्त पाणीसाठा +९७.४३द.ल.घ.मी
टक्केवारी: +६.४२%
विसर्ग
दौंड >९७०४ क्युसेक
बंडगार्डन >३८१९क्युसेक

0 Comments