पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

दि. 14 ऑक्टोबर 2015

ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची राज्याचे महाअधिवक्ता या पदावर नियुक्तीची शिफारस राज्यपालांकडे करणार्‍या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.यापूर्वी या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या महत्त्वूपर्ण घटनात्मक पदावर पूर्ण वेळ नियुक्ती होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

 सुनिल मनोहर यांनी महाअधिवक्ता पदाचा राजीनामा जून 2015 मध्ये दिल्यानंतर  श्री. सिंग यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. श्री. सिंग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या पदाची जबाबदारी सांभाळल्याबद्दल त्यांचे मंत्रिमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी श्री. अणे यांना 1992 मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्यांना उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण प्रकरणात शासनाची बाजू मांडण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.



000

______