पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 24 ऑक्टोबर 2015
कोळी महासंघाच्या वतीने शासन निर्णयाचे पेढे वाटून स्वागत करताना प.महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ,कोळी, महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण लोणारी,कोळी महासंघ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रामभाऊ कोळी,सोलापूर शहाध्यक्ष सुरेश प्याटी,शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल कोरे,रामभाऊ कोळी,नवनाथ करकमकर,अमोल करकमकर,नवनाथ वाखरकर,प्रसाद कोळी,धिरज परचंडे,अजित अभंगराव,अक्षय नेहतराव,सुचित अभंगराव आदी.
राज्य शासनाने कोळी समाजातील जे कर्मचारी अनुसुचित जमातीच्या दाखल्याच्या आधारे शासनाच्या सेवेत 1995 पुर्वी दाखल झाले होते अशा कर्मचार्यांना दिलेल्या संरक्षणाच्या कालावधीत वाढ करीत आता 2001 सालापर्यंत सेवेत दाखल झालेल्या कर्मचार्यांना संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी नुकताच जाहीर केला असून शासनाच्या या निर्णयामुळे नोकरीवर टांगती तलवार असलेल्या कोळी समाजातील हजारो कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.शासनाने हा निर्णय घ्यावा यासाठी कोळी महासंघाचे राज्याध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी वर्षानुवर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता.शासनाच्या या निर्णयामुळे कोळी महासंघाच्या वतीने पंढरीत फटाके फोडुन व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.अशी माहीती कोळी महासंघाचे प.महाराष्ट्र अध्यक्ष अरुण कोळी यांनी दिली आहे.
राज्यातील 20 हजार समाजबांधव गेल्या वीस वर्षापासून अतिशय तणावात होते.नोकरी गमावण्याच्या भितीने अनेक कर्मचार्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते.अनुसुुचीत जमातीमध्ये महादेव कोळी समाजाचा समावेश असतानाही उत्तर महाराष्ट्रातील काही नेते पश्चिम महाराष्ट्रात जातीचे दाखले देण्यास विरोध करीत आले होते.कोळी समाज बांधवांना नोकरीत संरक्षण मिळावे यासाठी कोळी महासंघाचे रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्याध्यक्ष डॉ.गजेंद्र भांजे,उपाध्यक्ष रामकृष्ण केणी,प्रकाश बोबडी,राजहंस टपके,ठाणे जिल्हाध्यक्ष शरद कोळी,अॅड.चेतन पाटील,महिला राज्याध्यक्षा सुमनताई कोळी यांच्या शिष्टमंडळाने यासाठी मुख्यमंत्र्याची 19 ऑगस्ट रोजी भेट घेवुन या बाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र शासनाने 21 ऑक्टोंबर रोजी महादेव कोळी समाजातील शासकिय कर्मचार्यांना नोकरीत संरक्षण देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.यापुर्वी युती शासनानेच 15 जून 1995 रोजी कोळी समाजातील शासकिय कर्मचार्यांना संरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.आता पुन्हा एकदा युती शासनाने असाच निर्णय घेवून मोठा दिलासा दिला आहे.त्यामुळे कोळी महासंघाच्या वतीने शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत अशी माहीती अरुणभाऊ कोळी यांनी आज येथील शासकिय विश्रामगृह येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण लोणारी,कोळी महासंघ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रामभाऊ कोळी,सोलापूर शहाध्यक्ष सुरेश प्याटी,शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल कोरे यांच्यासह कोळी महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________








0 Comments