पंढरपूरच्या उपनगरातील सामाजिक कार्यकर्ते व खादी ग्रामोद्योग चे संचालक श्री.गणेश सिंघण यांचे वाढदिवसानिमित्त येथील कर्मयोगी पतसंस्थेमध्ये युटोपियन शुगर्स चे चेअरमन श्री. उमेशराव परिचारक यांचे शुभहस्ते श्री. सिंघण यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उमेशराव परिचारक म्हणाले की, ‘‘सध्या युवकांनी आपला उद्योग-व्यवसाय-नोकरी-शिक्षण आदी क्षेत्रात चौफेर प्रगती केलीच पाहिजे मात्र याबरोबरच फावल्या वेळात स्वत:ला समाजकार्यात झोकून देण्याची आवश्यकता आहे. गणेश सिंघण यांची सामाजिक क्षेत्रातील वाटचाल लक्षणीय आहे, सामाजिक कार्याचा समृध्द वारसा त्यांना पिढीजात लाभला आहे. तो जपत त्यांनी पुढील काळात सामाजिक कार्यात अधिक गतीमान व्हावे.’’
यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, कला शिक्षक प्रदिप पांढरे (सर) रमेश चव्हाण, प्रतापसिंह देवकर, सचिन ताम्हणे, आनंद भोसले, आशिष देशमाने व उद्योजक विजय सुरवसे आदी उपस्थित होते.
0 Comments