खादी ग्रामोद्योग चे संचालक गणेश सिंघण यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा..... वाढदिवसानिमीत्त चा अवाजवी खर्च टाळत ‘पालवी’ संस्थेस आर्थिक सहकार्य करुन युवकांपुढे ठेवला आदर्श......
दि. 2 ऑक्टोबर 2015 रोजी येथील नागालॅन्ड चौक परिसरातील समाजसेवक व खादी
ग्रामोद्योग चे संचालक श्री.गणेश सिंघण यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आज-कालच्या पार्टी आणि डिजीटल संस्कृतीला फाटा देत श्री.सिंघण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही डामडौल न करता येथील ‘पालवी’ या सामाजिक संस्थेस आर्थिक मदत केली. आपली सामाजिक बांधिलकी जपत श्री.सिंघण यांनी आगळ्या पध्दतीने आपला वाढदिवस साजरा करुन युवकांपुढे एक आदर्श ठेवला आहे.
यावेळी पालवी च्या संस्थापक मंगलताई शहा, संस्थाचालक डिंपल शहा, संदीप जगताप, प्रतापसिंह देवकर, कैलास स्वामी, आशिष देशमाने, रमेश खराडे, श्रीकांत तोडकरी, सचिन ताम्हणे आदी उपस्थित होते.
0 Comments