पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 23 नोव्हेंबर 2015
दुर्गाष्टमीचे औचित्य साधून टाकळी रोड येथील लक्ष्मण नगर येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर तालुका काँगेेस महिला कमिटीच्या अध्यक्षा राजश्री लोळगे यांनी हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून बचत गटातील महिलांचे स्वयंरोजगारासाठी प्रबोधन केले व भविष्यात नारीशक्ती एकत्र आली तरच आर्थिक प्रगतीला खर्या अर्थाने चालना मिळणार असल्याचे ओळखून विविध महिला मंडळांना या कार्यक्रमास आमंत्रित करून, त्यांना माहिती दिली.
यावेळी बोलताना राजश्री लोळगे म्हणाल्या की, स्त्रीला जसे दुर्गेचा अवतार मानले जाते तसेच जर स्त्रीने स्वयंरोजगाराची वाट चोखाळली तर ती खर्या अर्थाने घराची लक्ष्मी ठरते. स्त्रीयांनी आता संसाराचा रथ ओढण्यासाठी नाही तर भविष्याचा वेध घेवून प्रगती करावयाची आहे हे ध्येय मनी बाळगले पाहिजे.यावेळी सौ.वाघमारे, सौ.चौगुले, रेणुका जोजारी, सौ.पालसांडे, सुवर्णा इंदापूरकर, सौ.कांबळे, सौ.वांगीकर, अमृता अष्टेकर, शुभांगी अष्टेकर, मीरा माडकर यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो ओळ ः लक्ष्मण नगर येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री लोळगे व उपस्थित महिला
________________







0 Comments