पंढरपूर लाईव्ह वृत्त:-
दि. 14 ऑक्टोबर 2015
मुंबई, दि. 14 : मेक इन महाराष्ट्र, स्मार्ट सिटी यासारख्या योजनांमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. अनेक देशांतील उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. कॅनडातील अनेक उद्योजकांकडून राज्यात होणारी गुंतवणूक राज्याला प्रगतीपथावर नेईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त नादिर पटेल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई, ब्रायन पॅरेट, पलाश रॉय चौधरी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठीच्या अनुकुल वातावरणामुळे कॅनडातील उद्योजक येथे उद्योग उभारण्यासाठी उत्सुक आहेत, असे श्री. पटेल यांनी सांगितले.
0000
______





0 Comments