पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूर दि.16 ऑक्टोबर 2015
पंढरपूर - येथील पंढरपूर तालुका विधी व सहाय्य समिती आणि पंढरपूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.विनायक राऊत यांनी ताण-तणाव नियमन व वेळेचे व्यवस्थापन याविषयी विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ.विनायक राऊत म्हणाले की, ‘‘आजच्या एकवीसाव्या शतकातील स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचे जीवन धावपळीचे व धकाधकीचे झालेले असल्याने बहुतांश लोकांचे जीवन तणावग्रस्त झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, शारीरिक, मानसिक व प्रापंचिक जीवनावर प्रत्यक्षयावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ विधिज्ञ भारत बहिरट यांनी कायदेविषयक साक्षरतेची गरज या विषयाचे विवेचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी.पाटील होते.
सदर कार्यक्रमास पंढरपूर येथील सिव्हील जज्ज शिरसाळकर , डी.व्ही.गौरगौड , सुपेकर , जी.एम. माने , माळी जमादार मॅडम, विधी व सहाय्य समितीचे रेपाळ उपस्थित होते. तसेच बार असोसिएशन पंढरपूरचे बहुंताश सदस्य व पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्यु.डी.सौ.यादव मॅडम यांनी मानले. डॉ.विनायक राऊत आणि अॅड.भारत बहिरट यांच्या व्याख्यानामुळे वकील आणि पक्षकार यांनी समाधान व्यक्त केले.








0 Comments