चळे येथे 26/11 च्या शहिदांना श्रध्दांजली

। चळे, प्रतिनिधी
चळे येथे 26/11 या मुंबई हल्ल्यात शहिद झालेले अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, व माढ्याचे सुपूत्र राहूज शिंदे यांना शहिद अशोक कामटे प्रतिष्ठानच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. 
यावेळी शहिंदाच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग सहकारी साखर कारकाखान्याचे संचालक हरिष दादा गायकवाड, चळे ग्रा.प. उपसरपंच राजाराम गायकवाड,  राजमाता जिजाऊ  पंतसंस्थेचे चेअरमन डॉ. रामदास घाडगे, संतोष गायकवाड, शहिद अशोक कामटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मोरे व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी  कृष्णा पकाले, बंडू  देवळे, नवनाथ काळे, गणेश मलपे, बालाजी मोरे, आवि  कांबळे, समाधान मोरे, नागनाथ शिंदे, दत्ता कदम, चैतन्य इंगोले, बालाजी मिसाळ, तानाजी वजाळे, व प्रतिष्ठानाचे सदस्य व चळे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments