जागतिक एडस दिनानिमीत्त

एडस् : प्रतिबंध हाच उपाय
दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावणाऱ्या एडस्‍ (ADIS) या जीवघेण्या रोगाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस पाळला जातो.  एडस्‍ हा एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. विषाणूमुळे होणारा हा आजार जीवघेणा आहे. या आजारात रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे क्षयरोग, जुलाब, मेंदुला जंतू लागण इत्यादी पैकी आजार होऊन त्यात रुग्णास मृत्यू येतो.
एच.आय.व्ही. या नावाच्या विषाणूंच्या लागणीमुळे एडस् होतो. एडस् लागण झालेल्या व्यक्तीचे लैंगिक स्त्राव व रक्त या मार्फत एचआयव्ही चे विषाणू पसरतात. त्यामध्ये (1) असुरक्षित लैंगिक संबंधामार्फत- एडस् ची लागण झालेल्या व्यक्तीशी निरोध न वापरता संभोग केला तर ( 2) दुषित रक्त मार्फत-  एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त दिले गेले तर (3) लागण झालेल्या गर्भवतीकडून बाळाला- आईच्या रक्तातील विषाणू वारेतून तिच्या बाळाकडे जातात आणि (4) दुषित सुया, हत्यारे या मार्फत- एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसाठी वापरलेली सुई, चिकारी, हत्यारे दुसऱ्यासाठी वापरताना नीट उकळली नाही तर एडस् ची लागण होते.
एड्स ची लागण व एड्स चा आजार एड्स ची उर्फ एच.आय.व्ही. या विषाणूची लागण झाल्यावर लगेच काही त्रास होत नाही. शरीरात विषाणू असूनही काही त्रास नाही असा हा कालावधी ३ ते १० वर्षे इतका मोठा असू शकतो . शरीरात विषाणू वाढतात. विषाणू खूप वाढले की आपली प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे निरनिराळ्या रोग जंतू लागणीमुळे आजार होऊ शकतात. नेहमीच्या औषधांनी बरा न होणारा जुलाब, ताप, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसतात, म्हणजेच एड्सचा आजार सुरु होतो. वरील सर्व काळात ही लागण झालेली व्यक्ती दुसऱ्याला लैंगिक स्त्राव व रक्तामार्फत लागण देऊ शकते. तसेच सुरुवातीचे दीड दोन ते सहा, महिने वगळता एड्स ची लागण झाली आहे हे रक्त तपासणीत समजते. एड्सचा आजार सुरु झाल्यावर रुग्णाचे वजन कमी होते.
एड्स च्या लागणी बाबतचे गैरसमज : एड्स झालेल्या व्यक्तीशी साधा संपर्क आला तरी आपल्याला एड्स होईल, हा समज चुकीचा आहे. एड्स ची लागण झालेल्यांसोबत राहणे, जेवणे, झोपणे इत्यादीमुळे ती पसरत नाही. अशी लागण टाळण्यासाठी एड्स ची लागण किंवा एड्स चा आजार झालेल्यांपासून दूर राहण्याची गरज नाही.एड्स ची लागण झालेली व्यक्ती वाईट वळणाची असते. हा समज चुकीचा आहे. समजा आपला पती सोडून बाकी कोणाशी लैंगिक संबंध नाही. पण तिच्या पतीला एड्स ची लागण झाली असेल तर तिच्या नकळत तिलासुद्धा लागण होऊ शकते. अशा अनेक स्त्रिया आहेत. असे संबंध नसतानाही दुषित रक्त व सुईतून एड्स ची लागण होऊ शकते. विवाह बाह्य व समलिंगी संबंध असले कि एड्स ची लागण होते असे म्हणणेही चुकीचे आहे. 
 एड्स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सन 2008 पासून 2015 पर्यंत एडस् रुग्णांची घटती टक्केवारी हे  जनजागृतीचेच फलित आहे.  प्रशासनामार्फत एडस् च्या जनजागृतीसाठी कार्यक्रम, मेळावे आयोजित करण्यात येतात.  तसेच  सामान्य रुग्णांची नियमित तपासणीही केली जाते. पंढरपूर तालुक्यात उप जिल्हा रुग्णालयामार्फत यावर्षी सुमारे 9969 रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली यामध्ये 237 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. 9819 गरोदर मातांची तपासणी करुण्यात आली यामध्ये 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले तर 15 पॉझिटीव्ह मातांचे बाळंतपण यशस्वीपणे करण्यात आले आणि 0 ते 18 महिने या कालावधील 77 बालकांची तपासणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्यात  डॉ. श्रीनिवास तोरणकर, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. अविनाश मोहिते, डॉ. ढसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी व रुग्णांचे समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन पथकात पुरषोत्तम कदम, बाजीराव नामदे, मीनाक्षी तोळे, संदीप देशमुख व युवराज वांगी यांचा समावेश आहे. या जीवघेण्या रोगापासून दूर राहण्यासाठी जनजागृती करण्याबरोबच प्रतिबंध हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे.
                                                                                                                       
                                                                        संकलन: उप माहिती कार्यालय,पंढरपू

Post a Comment

0 Comments