स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा ४ डिसेंबरला
पंढरपूर दि.01: युवा शक्ती पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयाकडे आकृष्ठ करुन त्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी पंचायत समिती, पंढरपूरच्या वतिने तालुकास्तरीय महाविद्यालयीन युवकांसाठी दि. 4 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 9.00 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ या दोन गटात होणार असून या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वच्छ भारत मिशन (ग्रामिक) पंचायत समिती पंढरपूर येथे दिनांक 4 डिसेंबर 2015 पर्यंत पर्यंत स्वीकारल्या जातील. या स्पर्धेमध्ये सर्व कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, डी.टी.एड, बी.एड, तंत्रनिकेतन तसेच समकक्ष महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे व सहाय्यक गट विकास अधिकारी पी.व्ही.वाडेकर यांनी केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन युवकांसाठीच्या गटासाठी विचार निर्मल महाराष्ट्राचा-प्रवास आव्हानांचा, जोश तरुणाईचा-जागर स्वच्छतेचा, शुध्द पाणी पिण्याचे-आरोग्य सांभाळी गावाचे, माझ्या स्वप्नातील स्वच्छ निर्मल गाव, आपलं पाणी आपली योजना या विषयावर तर वरिष्ठ महाविद्यालयासाठी राखू पाण्याची गुणवत्ता-मिळेल आरोग्याची सुबत्ता, लोक सहभाग गावाचा आधार-पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा, तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती, मी निर्मल गावचा सरपंच बोलतोय तसेच स्वच्छतेतून समृध्दीकडे या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी वयोमर्यादा 20 वर्षे व वरिष्ठ महाविद्यालयासाठी वयोमर्यादा 26 वर्षे राहील. एका स्पर्धकास कोणत्याही एकाच विषयावर बोलता येईल.कनिष्ठ महाविद्यालयातील एक स्पर्धकासाठी 7 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे तर वरीष्ठ महाविद्यालयातील एक स्पर्धकासाठी 10 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्रवास भाडे/भत्ता देय राहणार नाही.
स्पर्धेसाठी तालुकास्तरावरील दोन्ही गटातील विजेत्यांना प्रथम रुपये 5 हजार, व्दितीय 3 हजार तर तृतीय 2 हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरील स्पर्धेतून विजेते ठरलेल्या प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या स्पर्धेकांना जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पात्र ठरतील. सहभागी घेणा-या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व प्रवेशिका जमा करण्यासाठी विकास अधिकारी भारत रेपाळ (9890820346) व एस.एम.आदमाने (9552716179) यांच्याशी संपर्क साधावा.
00000
वृत्त क्र. - 192
पंढरपूर एस टी स्टँड येथे 4 डिसेंबरला
एड्स जनजागृती अभियान
पंढरपूर दि.01: जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्त उप-जिल्हा रुग्णालय, पंढरपूर मार्फत शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2015 रोजी दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत एस टी स्टँड पंढरपूर येथे एच आय व्ही / एड्स जनजागृती अभियान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

0 Comments