भुजबळांविरोधात आरोपपत्राला मुख्यमंत्र्यांची परवानगी

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र सदन आणि कालिना भूखंड घोटाळ्यात भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे.
 
गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कालिना भूखंड आणि महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात भुजबळांवर अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. आरोपपत्र दाखल केल्यास एसीबीला छगन भुजबळांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळणार आहे.

मध्यंतरी भाजप नेत्यांच्या बारामती दौऱ्यामुळे भाजप-राष्ट्रवादीचं सख्य निर्माण झालं की काय असा सवाल विचारला जात होता. पण आता मुख्यमंत्र्यांनी भूजबळांविरोधात चार्जशीट दाखल करायला परवानगी दिल्यामुळे काही नवीन घडामोडी घडतात का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments