पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे लोकअदालतीमध्ये 63 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दोन प्रकरणांमध्ये तडजोड

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

           
पंढरपूर, दि. 31 :-  पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये 63 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दोन प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ती निकाली काढण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिली.
            पंढरपूर उपविभागातील प्रलंबित असलेले दावे तडजोडीने मिटविण्यासाठी  तहसिलदार गजानन गुरव, सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. एल.ए. गवई, पंढरपूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. किरण घाटगे यांची समिती स्थापन करुन ही लोकअदालत घेण्यात आली. लोकअदालतीमध्ये जस्तीत जास्त पक्षकारांनी आपले दावे तडजोडीने मिटवावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी तेली यांनी केले.
            महसूल प्रशासनामार्फत लोकअदालत घेण्यामागचा उद्देश तहसिलदार गुरव यांनी यावेळी स्पष्ट करुन लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने मिटविल्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत असलेले खटले निकाली निघून वेळ व पैशाची बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. लोक अदालतीचा पक्षकारांना लाभ होऊन एकमेकामधील मतभेद कमी होण्यास मदत होते व गावातील तंटे कमी होण्यास मदत होत असल्याचे मत सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. गवई यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  मनोज श्रोत्री यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र कदम यांनी केले.

       ______________



Post a Comment

0 Comments