दहशतवाद रोखण्यासाठी संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज -डॉ. कामत *पंढरीत पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

* ध्वजारोहणाने संत नामदेव साहित्य संमेलनास प्रारंभ
* ग्रंथदिंडीत पुरुषांसह महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती
* नामदेव-जनाबाईच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
* रथ, पालखीसह टाळ-मृदूंगाच्या गजरात ग्रंथदिंडीची मंदिर प्रदक्षिणा
* श्री विठ्ठल उपासना व भावामृत ग्रंथांचे प्रकाशन
* रांगोळी प्रदर्शनात महिलांचा उत्स्ङ्गूर्त सहभाग


प्रतिनिधी, पंढरपूर
संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतात ङ्गडकविली. पंजाबसह संपूर्ण भारतात संत नामदेवांनी हरिनामाचा महिमा गाईला. संत नामदेवांसह सकल संत-महात्म्यांनी जगाला शांतीची व समानतेची शिकवण दिली. सध्या संपूर्ण जगामध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या दहशतवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संतांचे विचार हेच प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे दहशतवाद रोखण्यासाठी संतांची शांतीची व समानतेची शिकवण आचरणात आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.

वारकरी संप्रदायातील आद्य कीर्तनकार, भागवत धर्माचे प्रसारक संत शिरोमणी नामदेव महाराज व समकालीन संत मंडळी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचे उद्घाटन संत तनपुरे महाराज मठ येथे करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
संमेलनाचा प्रारंभ ध्वजारोहणाने करण्यात आला. ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. नामदेव-जनाबाई, ज्ञानोबा-तुकारामाराचा जयघोष करीत, टाळ-मृदूंगाच्या निनादात हा दिंडी सोहळा निघाला. संत नामदेवरायांच्या ङ्गुलाने सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये पालखीत ग्रंथ व संत नामदेवांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
संत तनपुरे महाराज मठातून, स्टेशन रोड, शिवाजी चौक, चौङ्गाळा, पश्‍चिमद्वार, महाद्वार, मंदिर प्रक्षिणा करून हा दिंडी सोहळा संमेलनस्थळी आली. या ग्रंथदिंडीमध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. संमेलनस्थळी ग्रंथ व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आ.भारत भालके, माजी आ.सुधाकरपंत परिचारक, चेअरमन कल्याणराव काळे, संमेलनाचे कार्याध्यक्ष ह.भ.प.वा.ना.उत्पात, नामदेव गाथाव्रती प्र.द.निकते गुरुजी, वारकरी-ङ्गडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, सर्वश्री ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जोगदंड, केशव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, ज्ञानेश्‍वर महाराज नामदास, सौ. भगवतीताई दांडेकर-सातारकर, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कादबाने यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. कामत म्हणाले, संत नामदेव महाराज हे सकल वैष्णवांचा राव आहेत. नामदेवरा यांनी केलेले कार्य हे अलैकिक आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. गुजरात, राज्यस्थान व संपूर्ण भारतात नामदेवांची सुमारे 150 मंदिरे आहेत. संत वाङमयाची परंपरा ही संत नामदेवरायांनी सुरु केली. नामदेवराय हे आद्य कीर्तनकार, आद्यप्रवचनकार, आद्य प्रवासवर्णनकार, स्त्रीमुक्तीचे प्रचारक होते. संत ज्ञानेश्‍वरांच्या संगतीत संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार केला. संत नामदेवांनी सुमारे दोन तप पंजाबमधील घुमान येथे वास्तव्य करून शिखधर्मियांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात संत नामदेवांच्या अभंगांचा समावेश आहे. वारकरी संप्रदायावर संत नामदेवांच्या विचारांचा ङ्गार मोठा प्रभाव आहे. संतांचे विचार हे समाजाला प्रेरणा देणारे व तारणारे आहेत. संत नामदेवांसह सकल संत-महात्म्यांनी जगाला शांतीची व समानतेची शिकवण दिली. सध्या संपूर्ण जगामध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या दहशतवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संतांचे विचार हेच प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे दहशतवाद रोखण्यासाठी व जातीयता नष्ट करण्यासाठी संतांना जातीच्या चौकटीपुरते मर्यादित न ठेवता त्यांची शांतीची व समानतेची शिकवण आचरणात आणणे गरजेचे आहे. त्याच बरोबर देशाची भावी आधारस्तंभ असलेल्या आजच्या तरुण पिढीला संत नामदेवरायांनी व सर्व संत मंडळींनी केलेल्या कार्याची माहिती व्हावी व त्यांचे समानतेचे, शांततेचे विचार समाजामध्ये रुजावेत या उद्देशाने संत नामदेव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारे यापुढे प्रत्येक वर्षी एका संतांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सौ. भगवतीताई दांडेकर-सातारकर म्हणाल्या, संत नामदेवरायांचा महिमा हा अगाध आहे. संत नामदेवराय हे स्त्री मुक्तीचे प्रणेते होते. त्यांनी जनाबाईला आपल्या सोबत घेवून तिला भागवत धर्माच्या प्रसाराचे कार्य केले. जनाबाईला संतपद मिळवून दिले. नामदेवांबरोबरच जनाबाईचे कार्यही त्याच तोलामोलाचे आहे. नामदेवरायांच्या बरोबरीने संत जनाबाईने विठ्ठलभक्ती केली. जनाबाई या पहिल्या स्त्री संत होत असे त्यांनी सांगितले.
आ. भारत भालके म्हणाले, पहिले संत नामदेव साहित्य संमेलन हे माझ्या मतदार संघात होत असून हे मी माझे भाग्य समजतो. पंढरपूर ही संत नामदेवांची तर मंगळवेढा ही संत दामाजींची जन्मभूमी आहे. या दोन्ही ठिकाणचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. आगामी काळात दरवर्षी होणार्‍या संत साहित्य संमेलनास आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. याप्रसंगी ह.भ.प. नामदास महाराज, वा.ना. महाराज उत्पात, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांच्यासह संत मंडळींनी आपल्या मनोगतातून संत नामदेवरायांच्या कार्याचा उल्लेख केला. समस्त नामदेव शिंपी समाज पंढरपूर, सावरकर वाचनालय, समस्त वारकरी-ङ्गडकरी दिंडी समाज संघटना, संत नामदेव युवक संघटना, संत नामदेव सेवा मंडळ, संत नामदेव महिला मंडळाच्या संयुक्तकक विद्यमाने हे संमेलन होत आहे. प्रास्ताविकात प्र.द. निकते गुरुजी यांनी संत नामदेव साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबतची माहिती दिली. तसेच तीन दिवसात एकूण 11 ज्ञानसत्र होणार असून त्याद्वारे संत नामदेव महाराजांचे जीवन चरित्र व साहित्याचा सर्वकष परिचय संमेलनार्थींना व्हावा, असे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. प्रा.दीपक निकते यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. उद्घाटन सोहळ्यास राज्यभरातून आलेले सर्व नामदेव भक्त, पत्रकार मंडळी, सर्व नामदेव शिंपी समाज बांधव व महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छायाचित्रकार -किशोर काकडे)



       ______________



Post a Comment

0 Comments