‘नामयाची संतवाणी’ व कवी संमेलनाचे रसिक, श्रोते मंत्रमुग्ध

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

पंढरपूर (प्रतिनिधी) ः ‘माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी’, ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदिप लावू जगी’, ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या संत नामदेवांच्या रसाळ अभंगवाणीचा स्वर प्रसिध्द गायक उपेंद्र भट यांच्या सुमधूर आवाजात ऐकण्याची संधी मिळाल्यामुळे रसिक, श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले.
संत नामदेव साहित्य संमेलनामध्ये कै.डॉ.हे.वि. इनामदार व्यासपीठावर शनिवारी सायंकाळी 9.30 वाजता ‘नामयाची अभंगवाणी’ हा उपेंद्र भट यांचा बहारदार अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कादबाने व ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज नामदास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष ह.भ.प.वा.ना. उत्पात, प्र.द. निकते सर उपस्थित होते.

              रात्रीच्या शांततेच्या वेळी गायक उपेंद्र भट यांच्या सुमधूर आवाजात संत नामदेवांचे अभंग एकण्यात रसिक-श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता.

सहाबहार कवी संमेलन

संत नामदेव साहित्य संमेलनाच्या अंतर्गत कवी संमेलनाच्या सदाबहार कार्यक्रम सावरकर वाचनालय येथे पार पडला. या कवी संमेलनामध्ये डॉ. प्रदीप निङ्गाडकर, डॉ. शंतनु चिंघडे, नंदन रहाणे, आनंद रहाणे, ज्योती चंदगुडे, पांढरी पांडे, प्रभात सोनवणे, माधवराव साठे, धनंजय तडवळकर, ऋुचा कर्वे आदींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. यामध्ये संत नामदेव तसेच दुष्काळी परिस्थितीवर आधारित असलेल्या कवितांचा समावेश होता. नवोदित कवींनी सादर केलेल्या कवितांमुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी मान्यवरांसह नवोदित कवीचा सत्कार ह.भ.प. वा.ना. उत्पात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.




       ______________



Post a Comment

0 Comments