तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक निकाल आज
पंढरपूर दि.02: तालुक्यातील 53 ग्रामपंचयतीची मतमोजणी मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 8.00 वाजता शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे होणार असून दुपारी 1.00 वाजेपर्यत निकाल अपेक्षीत असल्याची माहिती तहसिलदार गजानन गुरव यांनी दिली.
या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन, तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींची मतमोजणी 20 टेबलवर 12 फे-यात होणार आहे. यासाठी 53 निवडणुक निर्णय अधिकारी , 53 सहायक निवडणुक निर्णय अधिकारी व 40 मतमोजणी कर्मचारी, 25 शिपाई तसेच अतिरिक्त 10 कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी दरम्यान रेल्वे मैदान येथे नागरीकांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणी केंद्रात उमेदवार व प्रतिनिधी यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाईल. मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरीकांनी आपली वाहने मतमोजणी केंद्रा जवळील रस्त्यावर लावू नयेत तसेच या ग्रामपंचायतींचा निकाल तात्काळ निवडणुक आयोगाच्या वेब साईटवर भरण्यात येणार असल्याची माहिती तहसिदार गजानन गुरव यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी नागरीकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहनही तहसिलदार गुरव यांनी केले.
00000

0 Comments