भाविकांच्या सुवेधेसाठी नवीन दर्शन बससेवा सुरु

     
      पंढरपूर दि.09-  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी  पंढरपूरात येणा-या भाविकांना सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर येथील तीर्थक्षेत्राचे दर्शन घेता यावे. यासाठी पंढरपूर आगारामार्फत सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर 2015 पासूण नवीन दर्शन बसची सेवा सुरु केली आहे. या दर्शन बसचे उद्घाटन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथील महाव्दार येथे प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
           पंढरपूर  हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज 30 ते 40 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. येणा-या भाविकांची कमी वेळेत पंढरपूरला येणारी दर्शन बसची मागणी होती. त्यानुसार  पंढरपूर आगारामार्फत  ही दर्शन बससेवा सुरु केली असुन, ही बस  सकाळी 7 वाजता  पंढरपूर येथून सुटून  सोलापूर येथील सिध्देश्वर मंदीर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदीर तसेच तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घडवून संध्याकाळी  8.00 वाजता  पंढरपूर येथे परत येणार आहे.
         ही दर्शन बस सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर या मर्यादित ठिकाणी थांबणार आहे.   या दर्शन बससाठी  दिनांक 25 नोव्हेंबर 2015 पर्यत 380/-  रुपये तिकीट भाडे आकारण्यात आले असून, दिनांक 26 नोव्हेंबर 2015 पासून 345/- रुपये तिकीट भाडे आकारण्यात येणार आहे. या बससेवेमुळे चार महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन होणार असल्यामुळे भाविकांनी  या दर्शन बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांतधिकारी संजय तेली यांनी केले.
          या उद्घाटना प्रसंगी मदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, आगार व्यवस्थापक श्री. हिप्परगांवकर,सहायक पोलिस निरिक्षक श्री.बोंदरे, तसेच एस.टी.महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments