पंढरीत शाश्‍वत हॉस्पिटलचे उदघाटन

 पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज   दि.26 नोव्हेंबर 2015

गेल्या चार वर्षापासून रुग्णसेवेत असलेले डॉ.विशाल फडे यांच्या शाश्‍वत हॉस्पिटलचे उदघाटन आज शुक्रवार दि.27 रोजी पंढरीतील सुप्रसिध्द डॉक्टर व्ही.ए.वोहरा यांच्या हस्ते महावीर नगर येथे होणार असुन या कार्यक्रमास आय.ए.ए.चे अध्यक्ष डॉ.पंकज गायकवाड,मोहनलाल रुपचंद फडे,उदयकुमार पवनलाल फडे,राजेंद्र पवनलाल फडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

            डॉ.विशाल फडे हे हृदयरोग,दमा,पोटाचे विकार,मधुमेह विकार तज्ञ असून अल्पावधीतच त्यांनी मोठी लोकप्रियता प्राप्त केली आहे.रुग्णास अ‍ॅडमिट करुन उपचार घेण्याची वेळ अल्यास सुसज्ज अंतरुग्ण विभागाची गरज आहे हे ओळखून सर्व सुविधांनी युक्त अशा शाश्‍वत हास्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.या रग्णालयात अतिदक्षता विभागासह विविध गंभीर आजारांवर उपचार करण्याची सोय आहे.

Post a Comment

0 Comments