कै.दे.भ.बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेद्बारे मिळणार पंढरपूरकरांना बौध्दिक मेजवानी


पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज 


दि.26 नोव्हेंबर 2015             

 दि.पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे सहकार सप्ताह निमित्त बँकेच्या सर्व सभासद, रसिक ग्राहकांच्या व्यासंगाचे भरणपोषण होणेसाठी देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांनी दिली. सदर व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ व मध्यवर्ती गणेश मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ दि.28 नोव्हेंबर 2015 रोजी सायं.6.30 वाजता बँकेचे कुटुंबप्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक न्यायमंत्री श्री.दिलीपजी कांबळे यांचे शुभहस्ते संपन्न होणार असून सदर व्याख्यानमालेमध्ये शनिवार दि.28 नोव्हेंबर 2015 रोजी सामाजिक न्यायमंत्री श्री.दिलीपजी कांबळे यांचे सामाजिक समरसता या विषयावर रविवार दि.29 नोव्हेंबर 2015 रोजी प्रतापगडचे युध्द व शिवाजी महाराजांची युध्दनिती या विषयावर श्री.प्रशांत देशमुख यांचे सोमवार दि.30 नोव्हेंबर 2015 रोजी श्री.संजय नहार यांचे संत साहित्य आणि दहशतवाद या विषयावर तर मंगळवार दि.01 डिसेंबर 2015 रोजी महाराष्ट्र काल, आज आणि उद्या या विषयावर डॉ.सदानंद मोरे यांचे तर बुधवार दि.02 डिसेंबर 2015 रोजी  डॉ.अनिल मडके यांचे बदलत्या जीवन शैलीचे आजार या विषयावर व्याख्याने आयोजित केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

           विविध सामाजिक विषयांवर विचारमंथन होवुन पंढरपूरकरांना बौध्दिक मेजवानी देणेसाठी
व्याख्यानमालेचे आयोजन प्रतिवर्षी करणेत येते असे ही यावेळी ते म्हणाले. सदर व्याख्यानमाला जिजामाता उद्यान येथे सायंकाळी ठिक 6.30 वाजता होणार असून बँकेच्या जास्तीत जास्त ग्राहक सभासद हितचिंतकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे व्हा.चेअरमन श्री.दीपक शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.लक्ष्मण डिंगरे, जनरल मॅनेजर श्री.उमेश विरधे तसेच बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments