पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज
दि.26 नोव्हेंबर 2015
26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केले. देशामध्ये वाढती अशांतता पहाता या संविधानाचे दैनंदिन जिवनामध्ये आचरण केल्याशिवाय देशात शांतता प्रस्थापित होणार नाही असे प्रतिपादन आर.पी.आय. चे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केले.
आज संविधान दिनाचे औचित्य साधुन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा पंढरपूर मधील सर्व शासकीय कार्यालयामध्ये वाटप करण्यात आली व या कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आली.
तसेच तहसिल कार्यालयामध्ये आर.पी.आय. व तहसिल कार्यालय यांच्या विद्यमाने संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमामध्ये आर.पी.आय. शहराध्यक्ष संतोष पवार, आप्पासाो जाधव, जितेंद्र बनसोडे, अर्जुन मागाडे, अमित कसबे, पत्रकार अभिराज उबाळे, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे, संजय शिवशरण, समाधान लोखंडे, बाळासाो लोकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments