करकंब मध्ये चोरटयांचा धुमाकूळ....... देशमुख वस्ती परिसरात एकाच रात्री 3 चोऱ्या


पंढरपूर Live :-करकंब:- (गोपीनाथ देशमुख यांजकडून)


            देशमुख वस्ती परिसर करकंब मध्ये रात्री काही अंतरावरील तीन वस्त्यांवर लोखंडी गज, काठी, दगड इ. हत्यारांचा वापर करुण तीन-चार चोरट्यांनी धुमाकूळ घातला. परिसरातील दगडू भगवान खारे यांच्या वस्तीवर रात्री साडेबारा वाजता तीन चोरटे आलेले त्यांनी स्वतः पाहिले. ते आडवे गेले असता त्यांच्या शातीवर दगड मारला, चोरटे घरात गेलेले पाहिले असता त्यांचा मुलगा घरा बाहेर आला असता त्याच्या डोक्यात लोखंडी गज मारुण चोरटे पळून गेले.त्यांचा पाठलाग त्यांनी स्वतः व त्यांच्या मुलीने केला परंतु ते पसार झाले.

    काही वेळातच चोरटे पुढे हनुमंत शिवाजी देशमुख यांच्या वस्तीवर पोहचले व ते झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करुण बाजूच्या खोलीचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला.लोखंडी गजाच्या सहाय्याने त्या खोलितील कपाट उघडून त्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने व तीन हजार रु. रोख रक्कम पळवुन नेली.
     चोरट्यांनी तेथून पळ काढत पुढे वसंत गोंधळी यांची वस्ती गाठली. तेथे त्यांना अडविले असता त्यांचा मुलगा दिलीप वसंत गोंधळी व त्याची आई यांना दगड़ाने मारले व घरातील दोन लाकडी पेटया घेऊन पसार झाले.
      वरील घटनेतील जखमी औदुंबर दगडू खारे व दिलीप वसंत गोंधळी यांना करकंब मधील जगताप हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
    घटनास्थळी पंढरपुर उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव,सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी नागरिकांना पोलिस मित्र बनन्याचे आव्हान केल.

Post a Comment

0 Comments