न्यू इंग्लिश स्कूल मध्ये क्रिडासप्ताह सुरु

करकंब:- (गोपीनाथ देशमुख यांजकडून)

         
             न्यू इंग्लिश स्कूल करकंब मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही क्रिडा  सप्ताहाची सुरवात आज पासून झाली.यावेळी प्रशालेच्या वतीने नूतन सरपंच,उपसरपंच,ग्रा.सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.क्रिडा सप्ताहाच्या कालावधीत कब्बडी,खो-खो, लांब उडी,उंच उडी,लिंबु चमचा,गोळा फेक,हॉलीबॉल, इ. स्पर्धा पाचवी ते दहावी च्या सर्व वर्गाच्या घेण्यात येणार आहेत.क्रिडा सप्ताहाचे उदघाटन करकंबचे सरपंच मा.आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
     यावेळी बोलताना खेळामुळेच आपले शरीर निरोगी राहून आपण आपले शरीर सदृढ़ ठेऊ शकतो तसेच विद्यार्थांनी शिक्षनाबरोबर खेळातही प्रगति करुण आपले व प्रशालेचे नाव खुप उंचवावे असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रचे प्रमुख पाहुने उपसरपंच मा.राहुल पुरवत, ग्रा.पं.सदस्य मा.नंदकिशोर व्यवहारे,प्रशालेचे मुख्याध्यापक खंडागळे सर,पर्यवेक्षक पिसाळ सर ,स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर,क्रिडा शिक्षक खपाले सर,देवकते सर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments