ग्रीन टीचा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम

मुंबई हल्ली फिट राहण्यासाठी ग्रीन टी प्याली जाते. मात्र, हीच ग्रीन टी तुमच्या शरीराला हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. ग्रीन टीचा दुष्परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

साधारणत: ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक मानली जाते. मात्र, एका नव्या संशोधनानुसार असं समोर आलं आहे की, सातत्याने ग्रीन टी प्यायल्यास प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

कॅलिफोर्निया-इरविन यूनिव्हर्सिटीच्या एका टीमने फळांवरील माशांचं परीक्षण केलं. या परीक्षणातून असं निदर्शनास आलं की, ग्रीन टीच्या सेवनामुळे त्यांचा शारीरीक विकास आणि प्रजनन क्षमता यांच्यावर दुष्परिणाम होऊ लागले.

शस्त्रज्ञांच्या माहितीनुसार, “ग्रीन टीची वाढती लोकप्रियता लक्षात घेता ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रीन टी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक उत्पादकांचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.”

फार्मास्युटिकल सायंसेजचे प्राध्यापक महताब जाफरी यांनी माहिती दिली की, “ग्रीन टीचं योग्य प्रमाणात प्यायल्यास आरोग्याला अनुकूल, तर प्रमाणापेक्षा अधिक प्यायल्यास शरीराला घातक ठरण्याची शक्यता आहे.”

ग्रीन टी शरीरास हानिकारक आहे, असे ठामपणे म्हणण्याआधी आम्हाला यावर अधिक संशोधन करायचं आहे. मात्र, ग्रीन टी कमी प्रमाणात प्यावी, असेही महताब जाफरी यांनी सांगितलं.

शास्त्रज्ञांनी ड्रोसोफिला मेलानोगास्टर फळ माशांवर ग्रनी टीच्या दुष्परिणामांचं परिक्षण केलं आहे. या परीक्षणादरम्यान असं निदर्शनास आलं की, ज्या माशा लार्वा आणि भ्रूण ग्रीन टी पॉलिफिनाल्सच्या (अँटी ऑक्सिडेंट) वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करत होत्या, त्यांच्या पिल्लांच्या शारीरीक विकास मंदावलेला दिसून आला.

महताब जाफरी यांच्या मते, “ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे पेशींवर परिणाम होतं. केमेलिया सिनेसिसच्या उत्पादिक केलेली ग्रीन टी जगभरात आपल्या खास वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, जेव्हा उंदीर आणि कुत्र्यांचं परीक्षण केलं गेल, त्यावेळी त्यांचं वजन कमी झाल्याचं लक्षात आलं आणि भ्रूणाचा विकासही मंदावलेलं दिसून आलं.”

“आम्ही ग्रीन टी आणि इतर नैसर्गिक उत्पादनं नक्की किती प्रमाणात सेवन केली पाहिजे, याबाबत संशोधनाची तयारी सुरु आहे. त्यानंतरच, माणसांनी ग्रीन टी किती प्रमाणात प्यावी, याबाबत आम्ही निश्चितपणे सांगू.”, असे ‘फंक्शनल फूड्स’ मासिकामधून सांगण्यात आलं आहे

Post a Comment

0 Comments