शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस नेमतवाडी येथे उत्साहात साजरा

पंढरपूर लाईव्ह वृत्त (गोपीनाथ देशमुख यांजकडून) दि.16-12-2015
करकंब:-
           नेमतवाडी येथे शरदचंद्र पवार विचार मंच व रणजित भैय्या शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने नेमतवाडी येथे मा.शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चव्हाण बंधू यांच्या वतीने शालेय मुलांना खाऊ व वह्या वाटप युवा नेते मा.विक्रम भैय्या शिंदे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणिस नागेश खटके,माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष अजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.   यावेळी नेमतवाडी तंटामुक्ति अध्यक्ष अनंतराव जगताप,ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण खुळे,अविनाश पाटिल,कुंडलिक माने,अजिनाथ काकडे,रामभाऊ पाटिल उपस्थित होते.   यावेळी विक्रम भैय्या शिंदे, मुख्याध्यापिका खटके यांनी आपले विचार व्यक्त केले,सूत्रसंचलन महादेव चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments