वाखरी येथील गुरुकुल हायस्कुल (एमआयटी) येथील लक्ष्मण कुंभार या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या.... फेसबुकवरील लक्ष्मण यांचे प्रोफाईल... ‘‘दूर जाताना तुला एकदा शेवटचं पाहायचं होतं....मन भरुन तुला कायमचं मनात भरायचं होतं...’’

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज
पंढरपूर दि.21 डिसेंबर 2015 

वाखरी (ता.पंढरपूर) येथील गुरुकुल हायस्कुल (एमआयटी) येथील लक्ष्मण मनोहर कुंभार  या शिक्षकाने संस्थेच्या आवाराच असलेल्या आपल्या क्वार्टरमध्ये (निवासस्थानी) पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.20/12/2015 रोजी घडली आहे.


याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, वाखरी येथे श्री.विश्‍वनाथ कराड यांची एमआयटी ही महाराष्ट्रातील नामांकीत असलेली  शैक्षणिक संस्था असून या संस्थेच्या गुरुकुल हायस्कुल मध्ये लक्ष्मण मनोहर कुंभार (वय34), रा.परिते, ता.माढा हे शिक्षक  म्हणून नोकरीस होते.  ते याच संस्थेत शिक्षकांच्या निवासासाठी असलेल्या शिक्षक क्वार्टर मध्ये वास्तव्यास होते. दि. 20/12/2015 रोजी त्यामच्या रहात्या घरातच छताच्या पंख्याला दोरीने फास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मनोहर नरहरी कुंभार (68) रा. परिते, ता. माढा यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात केली आहे. या घटनेचा अधिक तपास पो.हे.कॉ. श्री.ढवळे यांचेकडे असून तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. गावडेसाो यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालु असल्याची माहिती श्री.ढवळे यांनी पंढरपूर लाईव्ह ला दिली आहे. याबाबत अधिक माहिती साठी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी एमआयटी संस्थेशी संबंधीत कांहीजणांना विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाह

लक्ष्मण कुंभार यांची फेसबुकवरील प्रोफाईल ....

लक्ष्मण कुंभार यांचा फेसबुक या सोशल नेटवर्कमधील प्रोफाईल आम्ही तपासला असता यावरुन श्री.कुंभार हे कवी मनाचे, थोडेसे हळवे, काहीसे दिलखुलास  व एक सच्चा मनाचे व्यक्तीमत्व होते असे दिसून येते. त्यांनी शेवटचे फेसबुक हाताळले असेल ती तारीख होती 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजुन 27 मिनीट. कारण त्यांचे शेवटसे स्टेटस अपडेट यावेळी त्यांनी केलेले आढळले ते असे...  हिंदी शायरी मधील एक पोष्ट शेअर केलेली आढळते... 

‘‘यूँ खाली पलकें झुका देने से नींद नही आती.. 

    सोते वही लोग है जिनके पास किसी की यादें नही होती !!’’


त्यांच्या फेसबुकवर असलेल्या कांही मित्रांशी संपर्क साधूनही त्यांचेबद्दल माहिती घेणेचा प्रयत्न केला असता ते गेल्या वर्षभरापूर्वी दुसर्‍या संस्थेत नोकरीस होते हे कळले. मात्र खुप सुस्वभावी होते.... त्यांनी असे कसे केले? अशाप्रकारे त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने हळहळ व्यक्त होताना आढळून आली.
त्यांचा फेसबुकवरील प्रोफाईल पिक्चर बघा... त्यावरील वाक्य अशी... ‘‘दूर जाताना तुला एकदा शेवटचं पहायचं होतं...  मन भरुन तुला कायमचं मनात भरायचं होतं...’’


आमच्या वाचकांसाठी सविस्तर मिळाल्यास उद्या विस्तृतपणे याबाबतची बातमी दिली जाईल.....

Post a Comment

0 Comments