कात्रजमध्ये घरात घुसून महिलेवर गोळीबार

Monday, 14 December 2015
पुणे : पुण्याच्या कात्रजमधील गोकूळनगर परिसरात भरदिवसा महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञाताने घरात घुसून महिलेवर गोळीबार केला. या घटनेत तिच्या दंडाला गोळी लागली असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

25 वर्षीय राजश्री बेगडे  हिचा पती आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला असताना, अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि महिलेवर गोळी झाडली. मात्र गोळीबार करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीया प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपी फरार आहे.

Post a Comment

0 Comments