पुणे: स्मार्ट सिटीच्या विरोधाची तलवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्यान केली आहे. मनसेने स्मार्ट सिटी प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेतला.
राज ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना फोन केला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशी विनंती केली. फडणवीस यांनी राज ठाकरेंची ही मागणी मान्य केली. त्यानंतर मनसेने या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
‘स्मार्ट सिटी ही अत्यंत फसवी योजना असून हा केंद्राचा राजकीय खेळ आहे,’ अशी टीका राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर काही दिवसांपूर्वीच केली होती. ‘महापालिकेने केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करु पाहत आहे आणि त्यामुळेच मनसेचा या योजनेला विरोध आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले होते.
मात्र आज राज यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा करुन स्मार्ट सिटीला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.14 December 2015


0 Comments