लावणीकार रविराज सोनार सन्मानित

पंढरपूर । प्रतिनिधी,येथील अल्पावधितच नावारूपाला आलेले उदयोन्मुख साहित्यिक लावणीकार रविराज सोनार यांना त्यांनी आजवर साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल शेटफळ येथील कै.संग्रामसिंह (आप्पा) डोंगरे प्रतिष्ठानच्यावतीने सन्मानित करण्यात आले. 


रविराज सोनार यांच्या रंगमहाल’ (लावणी संग्रह 2012), विषयसुखाचा सुवर्णक्षण’ (लावणीसंग्रह 2013), भोवरा अन् भिंगरी ’ (ललित लेख संग्रह 2013), सौंदर्यलेणं’ (लावणी संग्रह 2013), आम्ही गोकूळच्या गोपीका’ (गौळण संग्रह 2014), पुष्पांश-मातृऋण गाथा’ (काव्यसंग्रह 2014), मातृवियोग’ (काव्यसंग्रह 2014), सांजफुल’ (कादंबरी 2014) आणि इश्काचा दरबार’ (लावणी संग्रह 2015) या दर्जेदार साहित्य निर्मितीबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे, मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे, पत्रकार राजाराम कानतोडे, अशोक कांबळे, नवनाथ पोरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फेटा, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरविण्यात आले. यावेळी

कै.संग्रामसिंह (आप्पा) डोंगरे प्रतिष्ठानच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील इतरही मान्यवर सारस्वतांचा गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.रविराज सोनार यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल गौरविण्यात आल्याने पंढरपूरातील साहित्य क्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून प्राचार्य शिवाजीराव बागल, कवी राजेंद्र झुंबर भोसले, अंकुश गाजरे, प्रदिप पांढरे, भगवान वानखेडे, गणेश गायकवाड या व इतर मान्यवरांनी रविराज सोनार यांचे आजवरच्या कार्यानिमित्त अभिनंदन करून पुढील साहित्य लेखन कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments