पंढरपूर (प्रतिनिधी)-
10 डिसेंबर या जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त सूचना व प्रसारण मंत्रालय (भारत सरकार) स्वीकृत केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली वृत्तपत्र समूहाच्या वतीने अखिल भारतीय मानवाधिकार रक्षा सन्मान समारंभाचे सर्वोदय मॉल कल्याण मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर येथील महेश उर्ङ्ग दौलत उंबरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी उंबरे यांनी सामाजिक क्षेत्रात गणेश उत्सवावेळी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार्या पोलीस कर्मचार्यांना अल्पोपहाराचे वाटप केले होते. तसेच वारकर्यांसाठी अन्नछत्र तर गोशाळांसाठी जनावरांच्या संगोपनासाठी चार्याची मदत केली होती. तसेच गोरगरीबांना थंडीच्या दिवसात पंढरपूरातील घाटावर झोपलेल्या लोकांना ब्लँकेट वाटप, वृक्षारोपन व त्यांच्यासाठी आरोग्य शिबीरे या व अनेक उपक्रमांसह विविध विविध समस्यांचे निराकरण करून गर्जूना न्याय मिळवून दिला आहे. मानवाधिकार संघटनेच्या संघटक पदाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात त्यांनी उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मानवाधिकार समाज गौरव पुरस्कार व मानवाधिकार रत्न पुरस्कार ङ्गिल्म निर्माता सुनिल बब्बर, मिलिंद दहिवले यांच्याहस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मिस हेरीडेस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धा विजेती शितल उपरे, शिर्डी साईबाबा संस्थानचे संचालक दिलीप वाघचवरे, गुजरात मानवाधिकार संघाचे दुर्गाप्रसाद त्रिवेदी, मंत्रालय प्रतिनिधी गणेश गुप्ता, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन महाराष्ट्र राज्याचे मिलिंद दहिवले, राष्ट्रीय भीम सेना अध्यक्ष श्रीधर साळवी, सोलापूर जिल्हाध्यक्ष गंगाधर कोळी, सांगोला अध्यक्ष दिगंबर साळुंखेे, मंगळवेढा अध्यक्ष संतोष मोरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष महिला माधवी कोळी, पंढरपूर शहराध्यक्ष दिप पवार, डॉ.चांदनी लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

0 Comments