पंढरपूरच्या सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह.महाराष्ट्र लाईव्ह न्युज :- दि.14 डिसेंबर 2015
 

कोर्टी, ता.पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूल येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने  41 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि. 18 ते 19 डिसेंबर 2015 या कालावधीत आयोजित केले आहे. हे प्रदर्शन सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी येथेच भरणार आहे.


सर्वसमावेशीत विकासासाठी विज्ञान व गणित हा यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. या विषयाला अनुसरुन सहा विषय निवडले आहेत. त्यामध्ये आरोग्य पोषण आणि स्वच्छता, संसाधन व्यवस्थापन, उद्योग, कृषि व अन्नसुरक्षा, आपत्कालिन व्यवस्थापन, दर्जेदार जीवनासाठी गणित या विषयांचा समावेश आहे. या विषयापैकी एका विषयावर आधारीत पहिली ते आठवी आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाततालुक्यातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यकांचा सहभाग असणार आहे.

 विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना खुले असून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन एम. एन. नवले व जनरल सेक्रेटरी रोहित एम. नवले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments