हजारो कोटी रुपये बुडवणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये स्कॉटलँड पोलिसांच्या ताब्यात...

हजारो कोटी रुपये बुडवणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये स्कॉटलँड पोलिसांच्या ताब्यात...

पंढरपूर Live 18 April

भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला लंडनमध्ये स्कॉटलँड पोलिसांनी अटक केली आहे. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले असून अद्याप वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मल्ल्याला लवकरच कोर्टासमोर हजर केले जाईल असे सूत्रांनी सांगितले.
भारतातील बँकांना ९ हजार कोटी रूपयांचा चुना लावून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच त्याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. . परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले होते. कर्जबुडव्या विजय मल्ल्याने २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला होता. मल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.

मंगळवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी मल्ल्याला अटक केली. मल्ल्याला वेस्टमिंस्टरमधील न्यायालयासमोर हजर करण्यात येईल असे समजते. मल्ल्याला नेमक्या कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे.

Post a Comment

0 Comments