आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांची हत्या....
कोयत्याने डोक्यावर वार करुन केली निघृण हत्या....!!
संशयीत आरोपी राजु भिंगे सह अन्य दोन आरोपी फरार...!
मिरज ग्रामीण पोलिस ठाणेत गुन्ह्याची नोंद...
सांगली (पंढरपूर लाईव्ह विशेष प्रतिनिधी) दि. 18 एप्रिल 2017
पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नामदेव ऊर्फ श्रीनिवास भुईटे यांची हत्या त्यांच्या सोबतच्या मित्रानेच आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरुन घडवून आणल्याची फिर्याद प्रसाद अनिल निर्मळ (24) रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाणेत दिली आहे. वरील गुन्ह्यातील तिन्ही संशयीत आरोपी फरार असून त्यांचेवर दि..18 एप्रिल 2017 रोजी पहाटे 3.01 वाजता मिरज ग्रामीण पोलिस ठाणेत भादवि कलम 302.34 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, दि.. 17 एप्रिल 2017 रोजी रात्री 8 वाजणेच्या सुमारास मिरज पंढरपूर रोडवर सांगली जिल्ह्यातील भोसे गावचे हदद्दीत खरशिंग फाटा येथे ही हत्या झाली. वरील वेळी व ठिकाणी मयत नामदेव ऊर्फ श्रीनिवास सुरेश भोईटे (वय 36) रा. पंढरपूर हे गाडीत प्रवास करताना त्यांचेसोबत असणारा संशयीत आरोपी राजु भिंगे, रा.पंढरपूर यांची आपसात आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा चालु होती. आरोपी भिंगे याने भुईटे यांना ‘‘मला पैसे दे धंदा चालु करतो.’’ असे बोलल्यावर ‘आधीचा हिशोब क्लियर कर नंतर देतो.’’ असे भुईटे बोलले. त्यांची आपसात मटक्याच्या आकडेचे हिशोबाबाबत चर्चा चालु होती. तेंव्हा आरोपी भिंसगे याने लघवी करण्याचे बहाण्याने वरील ठिकाणी गाडी थांबवली. मयत भुईटे हे ही गाडीखाली उतरले. याच वेळी त्यांचे गाडीचे मागुन आलेल्या बदामी रंगाच्या इंडीगो गाडीमधुन दोन अनोळखी इसम (वयअंदाजे 25 ते 30) हे उतरले व त्यांनी भुईटे यांचे डोक्यावर कोयत्याने पाठीमागुन वार करत त्यांची निघृण हत्या केश्रली. हे पाहुन फिर्यादीने भिंगे यास उद्देशुन, ‘अहो वाचवा बघा काय करतात ते!’ असा ओरडा केल्यावर राजु भिंगे याने फिर्यादीस आई वरुन शिवीगाळ करुन तोंडावर एक ठोसा मारुन व गालावर चापट मारुन, ‘‘गप्प बस नाहीतर तुझी पण अशीच गत करीन!’’ अशी धमकी दिली असल्याची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिस ठाणेत दाखल आहे.
वरील गुन्ह्यातील तिन्ही संशयीत आरोपी फरार असून त्यांचेवर दि..18 एप्रिल 2017 रोजी पहाटे 3.01 वाजता मिरज ग्रामीण पोलिस ठाणेत भादवि कलम 302.34 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.
2 Comments
पंढरपूरात असे अजून किती बळी जाणार?
ReplyDeleteपंढरपुरातील गुंड गीरी कधी संपनार
ReplyDelete