पंढरीतील एक लढवय्या समाजसेवक काळाच्या पडद्याआड..! पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांचा खुन... सांगली जिल्हा कवठेमहांकाळ जवळील शिरढोण नजीक गाडी आडवून धारधार शस्त्राने केला गेला खुनी हल्ला.. ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात... पोलिसांकडून कसुन चौकशी सुरु..

पंढरीतील एक लढवय्या समाजसेवक काळाच्या पडद्याआड..!
पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांचा खुन...

सांगली जिल्हा कवठेमहांकाळ जवळील शिरढोण नजीक गाडी आडवून धारधार शस्त्राने केला गेला खुनी हल्ला.. 

ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात... पोलिसांकडून कसुन चौकशी सुरु.. 


पंढरपूर Live - 18 April
पंढरपूरचे नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांच्यावर व त्यांच्या सहकार्‍यांवर मिरजकडे जाताना अज्ञात आरोपींनी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, शिरढोण नजीक त्यांची गाडी अडवून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.  यामध्ये भुईटे हे मयत झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. खरशिंग फाट्यावरून भुईटे यांचा मृतदेह पोलीसानी घेतला ताब्यात असल्याची माहितीही मिळत आहे.


श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत धडाडीचे कार्य केले होते. विशेषत: पंढरपूर येथील सर्व समाजांच्या स्मशान भुमीतील सोयी सुविधांसाठी त्यांनी अनेकदा उपोषण केले होते. यात त्यांना यशही मिळालेले होते. अनेकदा त्यांनी पंढरपूरमधील नागरिकरांच्या विविध प्रश्‍नांना सोडवण्यासाठी धाडशी पावले उचलली होती. आज त्यांच्या जाण्याने एक लढवय्या समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मिरजमध्ये भुईटे यांच्या एका आजारी  मित्रांवर उपचार सुरु होता. त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी भुईटे आपल्या मित्रांसमवेत जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला असल्याची प्राथमीक माहिती मिळते. हा हल्ला भुईटेंच्या सोबत असणार्‍या साथीदारांवर पुर्ववैमनस्यातून झाला. मात्र यात दुर्दैवाने भुईटे हे बळी गेले अशीही चर्चा ऐकावयास मिळते.

ही बातमी प्रसारीत करेपर्यंत पोलिसंाकडून मात्र अधिकृत माहिती मिळु शकली नाही.

पंढरपूर लाईव्ह परिवार व दै. दामाजी एक्सप्रेस परिवाराकडून या लढवय्या समाजसेवकास भावपुर्ण आदरांजली..! 

Post a Comment

0 Comments