उजनी बॅकवॉटरमध्ये तिघांचे मृतदेह सापडले, एकजण अजूनही बेपत्ता...

उजनी बॅकवॉटरमध्ये तिघांचे मृतदेह सापडले, एकजण अजूनही बेपत्ता... 1 May. 2017 इंदापूर तालुक्यातील अजोती गावाजवळ भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटरमध्ये वाहून गेलेल्या चार डाॅक्टरांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर अजूनही एक जण बेपत्ता आहे. सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेल 10 डॉक्टर उजनी बॅक वॉटरमध्ये बोटीतून प्रवास करत होते. ही बोट बुडाल्यानंतर 10 डॉक्टरांपैकी सहा डॉक्टर कसेबसे पाहून पाण्याबाहेर आले. काल रात्री उशिरा चौघांपैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर आज सकाळी एकाचा मृतदेह सापडला आहे. हे सर्व डॉक्टर्स सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस तालुक्यातील आहेत. एनडीआरफची टीम अजूनही या ठिकाणी दाखल झालेली नाही. हे मृतदेह शोधण्यासाठी गावकरी आणि मच्छिमारांची मदत घेतली जातीये. पण हे पाणी खोल असल्यानं  त्यासाठी एनडीआरफचीच मदत लागणार आहे.

Post a Comment

0 Comments