शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा.. मागणीसाठी पुण्यात बेमुदत उपोषण

शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा.. मागणीसाठी पुण्यात बेमुदत उपोषण
पंढरपूर Live (प्रतिनिधी) CM साहेबांनी आमचे म्हणणे ऐकून पालकांना व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे या मागणीसाठी पुणे स्टेशन सेन्ट्रल बिल्डिंग येथे सकाळी ठीक 11 वाजता प्राजक्ता पेठकर एज्यूकेशन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या चेअरमन सौ.प्राजक्ता पेठकर यांनी उपोषणास सुरुवात केली शिक्षणाचा बाजार थांबला पाहिजे,शाळाची नफेखोरी थांबली पाहिजे,ड्रेस वह्या पुस्तके विक्रीतून होणारी लुट थांबली पाहिजे,फी किती असावी यासंदर्भात मर्यादा असली पाहिजे.अशा अनेक मागणी संदर्भात उपोषण सुरू केले आहे यावेळी. सौ.हेमलता शिदे, गुजंण मेहता रूपाली महाजन.शांतिनाथ सावंत विविक वाघमारे ,तात्या मुंडफणे, दादा माने आदी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments