हलदहिवडी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी अजितदादा चव्हाण तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय व्हटे

हलदहिवडी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी अजितदादा चव्हाण तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय व्हटे पंढरपूर लाईव्ह :- (सचिन व्हटे) हलदहिवडी ता. सांगोला येथील लक्ष्मी देवी यात्रेच्या नियोजनासाठी कमिटीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते अजितदादा चव्हाण, उपाध्यक्षपदी दत्तात्रय व्हटे तर खजिनदार पदी धुळा सरक यांची निवड करण्यात आली. यात्रा कमिटीच्या या सर्व पदांची निवड झाल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे. या बैठकीस सरपंच मनीषा चव्हाण, उपसरपंच रूपाली कांबळे, महादेव चव्हाण, मच्छिंद्र लेंडवे, रामलिंग पवार, यशवंत चव्हाण, समाधान सातपुते, संजय गायकवाड, तानाजीकाका चव्हाण, धनाजी चव्हाण, शहाजी हांडे, धुळा सरक, शहाजी चव्हाण, अमोल लेंडवे, नितिन चव्हाण, सिद्राम चव्हाण आदी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments